तालिबानी हल्ल्यात १४१ अफगाणी सैनिक ठार

By admin | Published: April 23, 2017 03:14 AM2017-04-23T03:14:56+5:302017-04-23T03:14:56+5:30

उत्तर अफगाणिस्तानच्या एका सैन्य तळावर तालिबानींनी केलेल्या हल्ल्यात किमान १४१ अधिक अफगाणी सैनिक ठार झाले आहेत. या हल्ल्याने देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

141 Afghan soldiers killed in Taliban attack | तालिबानी हल्ल्यात १४१ अफगाणी सैनिक ठार

तालिबानी हल्ल्यात १४१ अफगाणी सैनिक ठार

Next

काबूल : उत्तर अफगाणिस्तानच्या एका सैन्य तळावर तालिबानींनी केलेल्या हल्ल्यात किमान १४१ अधिक अफगाणी सैनिक ठार झाले आहेत. या हल्ल्याने देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मृतांचा आकडा १५० हून अधिक असल्याचे अफगाणी सैन्याच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
मजार-ए-शरीफ शहराच्या जवळ झालेल्या हल्ल्यात किती नुकसान झाले याची माहिती मात्र मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली नाही. काही तास चाललेल्या या हल्ल्यात मशिद आणि भोजनालयातील सैैनिकांना लक्ष्य करण्यात आले. तालिबानच्या दोन हल्लेखोरांनी स्वत:ला उडवून देत मोठा हल्ला घडवून आणला. हे हल्लेखोर अफगाणी सैन्याच्या पोशाखात वाहनांमधून आले होते. या हल्ल्यात एकाही सर्वसामान्य नागरिकाचा मृत्यू झाला नाही. या हल्ल्यानंतर किती हल्लेखोरांना ठार मारण्यात आले, याची माहिती न देता संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, अफगाणी सैन्याने सर्व हल्लेखोरांना मारले असून, एका हल्लेखोराला पकडण्यात अफगाणी सैन्याला यश आले आहे.
अतिरेक्यांची आश्रयस्थाने नष्ट करा अफगाणिस्तानातील हल्ल्याचा भारताने स्पष्ट शब्दांत निषेध केला आहे. तसेच अतिरेक्यांची सर्व आश्रयस्थाने नष्ट करण्याचे आवाहनही करताना त्या देशाच्या सीमेलगत असलेली अतिरेक्यांची अनेक आश्रयस्थाने नष्ट करायला हवीत, असे म्हटले आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अफगाणिस्तानला सर्वोतोपरी मदत देण्याची भारताची तयारी आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

मोदींनी केला निषेध
नवी दिल्ली : उत्तर अफगाणिस्तानात सैन्य तळावर झालेल्या तालिबानी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. मोदी यांनी व्टिट केले आहे की, मजार -ए-शरीफ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो. ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो.

Web Title: 141 Afghan soldiers killed in Taliban attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.