ऑस्ट्रेलियात सापडलं 145 वर्ष जुनं पत्र
By admin | Published: February 16, 2016 05:20 PM2016-02-16T17:20:26+5:302016-02-16T17:52:38+5:30
ऑस्ट्रेलियामध्ये 145 वर्ष जूनं पत्र सापडल आहे. 1870मध्ये पॅरिसमधून चार्ल्स मेस्मिअर यांनी आपल्या आईला एअर बलूनच्या सहाय्याने हे पत्र पाठवल होत
Next
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. 16 - ऑस्ट्रेलियामध्ये 145 वर्ष जूनं पत्र सापडल आहे. 1870मध्ये पॅरिसमधून चार्ल्स मेस्मिअर यांनी आपल्या आईला एअर बलूनच्या सहाय्याने हे पत्र पाठवल होतं. हे पत्र ऑस्ट्रेलियाने राष्ट्रीय संपत्ती संग्रहात जपून ठेवलं आहे.
चार्ल्स मेस्मिअर यांनी 6 डिसेंबर 1870मध्ये आपल्या आईला लिहिलेल्या या पत्रात कुटुंबाच्या सुरक्षेची विचारपूस केली आहे. तसंच युद्ध आणि आपल्या परिस्थितीबद्दल माहितीदेखील दिली आहे.
हे पत्र ऑस्ट्रेलियामध्ये कसं पोहोचल ? याचा नेमका शोध सुरु आहे. लिलावात कोणीतरी हे पत्र घेतलं असाव आणि त्यांनी संग्रहालयात जमा केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय संपत्ती विभाग या पत्राचा ऑस्ट्रेलियाशी काही संबंध आहे का ? याची चाचपणी करत आहे. तसंचं चार्ल्स मेस्मिअर यांचा कोणी वंशज सध्या ब्रिस्बेनमध्ये स्थायिक आहे का ? याचादेखील तपास केला जातो आहे.
1870 मध्ये फ्रान्स व प्रशियन (रशिया) या दोन देशांत झालेल्या युद्धात फ्रान्सचा पराभव झाला होता. ज्यानंतर जर्मनीने पॅरिसला 4 महिन्यांहून अधिक काळासाठी वेढा घातला होता. यादरम्यान आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी इतर कोणतं साधन नसल्याने एअर बलूनचा वापर केला जात होता.
2 मिलियनहूनही अधिक पत्र यादरम्यान बलूनच्या सहाय्याने पाठवली गेली. छोट्या लिफाफ्यात ही पत्र पाठवली जायची जेणेकरुन जास्तीत जास्त पत्र पाठवता येतील. पत्र पाठवण्यासाठी कबुतरांचादेखील वापर केला जायचा जेणेकरुन कबुतरामार्फेत नातेवाईक पत्राच उत्तर पाठवू शकतील.
फोटो सौजन्य - एएफपी