चोरांनी गायब केला 15 कोटी रूपयांचा सोन्याचा पवित्र बॉक्स, कुणलाही लागली नाही खबर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 01:40 PM2022-06-08T13:40:42+5:302022-06-08T13:41:05+5:30
US Crime News : वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, टुमिनो लोकांचे कन्फेशन ऐकण्यासाठी जात होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, सेंट ऑगस्टीनचे दरवाजे उघडे आहेत.
US Crime News : एका चर्चमधून तब्बल 15 कोटी रूपये किंमतीचं पवित्र देवघर चोरीला गेलं आहे. चोरांनी इतक्या सफाईने चोरी केली की, घटनेच्या अनेक दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती काहीच पुरावे लागले नाहीत.
ही घटना अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या ब्रूकलेनमधील आहे. ही चोरी सेंट ऑगस्टीन रोमन कॅथलीक चर्चमध्ये झाली. चर्चचे धर्मगुरू फ्रॅंक टुमिनो यांच्या ही बाब सर्वातआधी लक्षात आली होती. ते म्हणाले की, पूजेशिवाय हे पात्र चर्चचं मुख्य आकर्षण होतं.
वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, टुमिनो लोकांचे कन्फेशन ऐकण्यासाठी जात होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, सेंट ऑगस्टीनचे दरवाजे उघडे आहेत. जेव्हा ते चर्चमध्ये शिरले तेव्हा त्यांना चोरी झाल्याचं समजलं. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. न्यूयॉर्क सिटी पोलिसांनी सांगितलं की, कुणीही चोरी होताना पाहिलं नाही आणि ना या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आहे.
टुमिनो म्हणाले की, चर्चच्या आत आणि बाहेर सिक्युरिटी कॅमेरा लागले होते. पण चोरी दरम्यान ते काढण्यात आले होते. पोलिसांनी सांगितलं की, पात्र एका मेटल केसच्या आत होतं. जे आरीने कापून उघडण्यात आलं होतं. पात्राच्या दोन्हीकडे मूर्तीही होत्या. ज्या तोडण्यात आल्या.
पोलिसांनी सोमवारी सांगितलं की, यारप्रकरणी त्यांना अजून कुणीही संशयीत सापडला नाही. पोलिसांनी लोकांना अपील केली आहे की, ज्यांनाही याबाबत काही माहिती असेल तर त्यांनी लगेच पोलिसांना सांगावं. टुमिनो म्हणाले की या चोरीत एकापेक्षा जास्त लोक सहभागी असतील. कारण पात्राचं वजन जास्त होतं.