चीनमध्ये १५ स्फोट, ६ ठार, १५ जखमी
By admin | Published: September 30, 2015 06:52 PM2015-09-30T18:52:40+5:302015-09-30T18:52:40+5:30
ग्वांग्झी प्रांतातील ल्युचेंग येथे दोन तासांच्या कालावधीत १५ ठिकाणी स्फोट झाले असून सहा जण ठार झाले आहेत तर १५ जण जखमी झाले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
ग्वांग्झी (चीन), दि. ३० - ग्वांग्झी प्रांतातील ल्युचेंग येथे दोन तासांच्या कालावधीत १५ ठिकाणी स्फोट झाले असून सहा जण ठार झाले आहेत तर १५ जण जखमी झाले आहेत. स्फोटकांच्या पार्सलच्या माध्यमातून हे स्फोट घडवण्यात आल्याचे चिनी पोलिसांनी सांगितले आहे.
शॉपिंग मॉल, सुपरमार्केट, तुरुंग, सरकारी इमारती अशा विविध ठिकाणी हे स्फोट झाले आहेत.
चिनी सोशल मीडिया वेईबोवर या घटनेचे फोटो टाकण्यात आले असून चिनी वृत्तसंस्था झिन्हुआनेही १५ स्फोट झाल्याचे म्हटले आहे. स्फोटांच्या संदर्भातील फोटोंमध्ये इमारतींची मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याचे दिसत आहे.
हे स्फोट कुणी घडवले, त्यांचं लक्ष्य कोण होतं, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.