अतिरेकी हल्ल्यात चीनमध्ये 15 ठार
By admin | Published: November 30, 2014 02:13 AM2014-11-30T02:13:42+5:302014-11-30T02:13:42+5:30
चीनच्या उत्तरपूव्रेकडील अस्वस्थ शिनजियांग प्रांतात शनिवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 गुंडांसह 15 जण ठार, तर 14 जण जखमी झाले.
Next
बीजिंग : चीनच्या उत्तरपूव्रेकडील अस्वस्थ शिनजियांग प्रांतात शनिवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 गुंडांसह 15 जण ठार, तर 14 जण जखमी झाले. हा हल्ला शाचे परगण्यात झाला, असे वृत्त सरकारी वृत्तसंस्था शिनहुआने दिले.
हल्लेखोरांनी वाहने, स्फोटके व चाकूंचा वापर केला. हल्ल्यात ठार झालेले 11 जण हे सरकारने गुंड म्हणून जाहीर केले होते. शिनजियांग प्रांतात उईघुर वंशाचे मुस्लिम असून अन्य प्रांतातून आलेले हान वंशाचे चिनी आणि स्थानिक रहिवाशांमध्ये अनेक वर्षापासून हिंसक संघर्ष सुरू असल्यामुळे हा प्रांत सतत अशांत असतो.
हा हिंसाचार अल कायदाचा पाठिंबा असलेल्या इस्ट तुर्किस्तान इस्लामिक मूव्हमेंट (ईटीआयएम) करीत असल्याचा चीन सरकारचा आरोप आहे.(वृत्तसंस्था)