अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात १५० सोमाली दहशतवादी ठार
By admin | Published: March 8, 2016 10:16 AM2016-03-08T10:16:37+5:302016-03-08T10:19:12+5:30
आफ्रिका खंडामधील सोमालिया देशात अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात १५० दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ८ - आफ्रिका खंडामधील सोमालिया देशात अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात १५० दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. सोमालियात दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला करून दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.
सोमालिया देशाची राजधानी असलेल्या मोगादिशु शहराच्या उत्तरेस सुमारे १२० मैल अंतरावरील अल शबाब या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रात मोठ्या हल्ल्याचा कट आखला जात होता. अल शबाबचे दहशतवादी अमेरिकन व आफ्रिकन युनियनच्या फौजांना टार्गेट करणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली, असे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे (पेंटॅगॉन) प्रवक्ते कॅप्टन जेफ डेव्हिस यांनी दिली. ही माहिती मिळताच अमेरिकेने त्या प्रशिक्षण केंद्रावर ड्रोन्सच्या सहाय्याने हल्ला केला, तो अतिशय यशस्वी ठरला, त्यात सुमारे दीडशे दहशतवादी मारले गेले.