अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात १५० सोमाली दहशतवादी ठार

By admin | Published: March 8, 2016 12:09 AM2016-03-08T00:09:46+5:302016-03-08T00:09:46+5:30

अमेरिकेच्या ड्रोन स्ट्राइक हल्ल्यात १५० हून अधिक सोमाली दहशतवादी ठार झाले आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार शनिवारी अमेरीकेने ड्रोनच्या साह्याने सोमालियावर हवाई हल्ला केला होता.

150 Somali terrorists killed in US drone strikes | अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात १५० सोमाली दहशतवादी ठार

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात १५० सोमाली दहशतवादी ठार

Next
>ऑनलाइन लोकमत
सोमालिया, दि. ७ - अमेरिकेच्या ड्रोन स्ट्राइक हल्ल्यात १५० हून अधिक सोमाली दहशतवादी ठार झाले आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार शनिवारी अमेरीकेने ड्रोनच्या साह्याने सोमालियावर हवाई हल्ला केला होता. आज आलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यात १५० पेक्षा आधिक दहशतवाद्यांना मारण्यात आले आहे. मारले गेलेले दहशतवादी हे अल शाबेब या या संघटनेचे होते. 
 
सोमालियाच्या दक्षिणकडे १२० मैल असणारे मोगाडिशू या शहराजवळील रासो येथे सुरु असलेल्या दहशतवादी कॅंपवर अमेरिकेच्या ड्रोन क्षेपणास्त्राने लक्ष्य केले. 
 
२०० दहशतवादी या कॅंप्म मध्ये ट्रेनिंग घेत होते. अमेरिका आणि आफ्रिकावेर मोठा हल्ला करण्यासाठी ट्रेनिंग घेत  असल्याची माहीती पेंटागांच्या सुत्रांनी दिली आहे  अमेरिकेवर हल्ला होण्यापुर्वीच ड्रोन हल्ला करुन त्यांनी दहशतवाद्याचा प्रयत्न निकामी केला.
 

Web Title: 150 Somali terrorists killed in US drone strikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.