धक्कादायक! रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 17 ठार, 3 गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 03:31 PM2022-09-28T15:31:24+5:302022-09-28T15:32:11+5:30

रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. 

17 people have died and 3 people have been injured in a fire at a restaurant in China  | धक्कादायक! रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 17 ठार, 3 गंभीर जखमी

धक्कादायक! रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 17 ठार, 3 गंभीर जखमी

Next

नवी दिल्ली : चीनमधील चांगचुन शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ईशान्य चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये बुधवारी लागलेल्या आगीत तब्बल 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. तेथील स्थानिक प्रशासनाने Weibo सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.40 वाजता चांगचुन शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेतली आणि दुपारी 3 वाजेपर्यंत मदत आणि बचाव कार्य पूर्ण झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, तसेच प्रशासनाद्वारे पीडितांची काळजी घेतली जात आहे. या घटनेच्या कारणाचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चांगचुन शहर हे वाहन उत्पादन केंद्र आणि जिलिन प्रांताची राजधानी आहे.

दरम्यान, 16 सप्टेंबर रोजी चीनमधील चांग्शा शहरातील एका गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली होती. मात्र सुदैवाने त्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. माहितीनुसार, या इमारतीमध्ये सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉमचे कार्यालय होते. 42 मजली इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 36 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. यासह 17 अग्निशमन केंद्रांमधून 280 हून अधिक अग्निशमन दलाचे कर्मचारी मदत आणि बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले.

टॅंकरच्या धडकेत लागली होती आग
मागील काही दिवसांपासून चीनमध्ये आगीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. 21 सप्टेंबरच्या दिवशी देखील एका भीषण आगीचा व्हिडीओ समोर आला होता. चीनच्या अनहुई प्रांतात सिलिकॉन तेलाच्या टँकरला झालेल्या धडकेनंतर ही आग लागल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये आगीच्या ज्वाळा आणि आकाशात काळ्या धुराचे लोट स्पष्टपणे दिसत होते. एक्स्प्रेस वेवर सिलिकॉन ऑईल टँकर आणि अन्य वाहनाची धडक झाल्याने आग लागली असल्याचे सांगितले जात आहे. 

 

Web Title: 17 people have died and 3 people have been injured in a fire at a restaurant in China 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.