दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 02:00 PM2020-08-01T14:00:53+5:302020-08-01T14:08:42+5:30

याप्रकरणी वेगवान चौकशी आणि कारवाईबद्दल ट्विटरने अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

17-year-old accused of masterminding Twitter bitcoin scam | दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर

दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर

Next
ठळक मुद्देट्विटर हल्ल्याचा गुन्हा दिग्गज लोकांच्या नावावरुन घडला असला तरी ग्रॅहम इव्हान क्लार्कचा सर्वसामान्यांकडून चोरी करण्याचा हेतू असल्याचेही अँड्र्यू वॉरेन यांनी सांगितले.

फ्लोरिडा : गेल्या काही दिवासांपूर्वी बिल गेट्स, एलॉन मस्क, कान्ये वेस्ट, बराक ओबामा आणि जो बायडेन यांसारख्या दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक केल्यामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला होता. फ्लोरिडामधील १७ वर्षांच्या मुलाने हे अकाउंट्स हॅक केल्याचे समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर ३० आरोप लावण्यात आले आहेत. हा ट्विटर हल्ला बिटकॉइन घोटाळ्यास चालना देण्यासाठी करण्यात आला. या प्रकरणात एफबीआय (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) आणि न्याय विभागाने (डिपार्टमेंट ऑफ जस्टिस) संपूर्ण देशात चौकशी केली. त्यानंतर या १७ वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली.

फ्लोरिडाच्या टैंपा येथील रहिवासी असलेल्या ग्रॅहम इव्हान क्लार्क या १७ वर्षीय मुलावर संस्थात्मक बनावट, फसवणूक आणि हॅकिंग असे अनेक आरोप आहेत. हिल्सबरो स्टेट अटर्नी अँड्र्यू वॉरेन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी ट्विटर हल्ल्याचा मुख्य सुत्रधार ग्रॅहम इव्हान क्लार्क असल्याचे अँड्र्यू वॉरेन यांनी सांगितले. तसेच, ग्रॅहम इव्हान क्लार्कने बिटकॉइनमधून दिवसाला एक लाख डॉलर्स मिळवल्याचेही अँड्र्यू वॉरेन म्हणाले.

ट्विटर हल्ल्याचा गुन्हा दिग्गज लोकांच्या नावावरुन घडला असला तरी ग्रॅहम इव्हान क्लार्कचा सर्वसामान्यांकडून चोरी करण्याचा हेतू असल्याचेही अँड्र्यू वॉरेन यांनी सांगितले. याबरोबर, हा ट्विटर हल्ला करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी न्याय विभागाने ब्रिटेनच्या १९ वर्षीय जॉन शेपार्ड आणि ऑरलँडोचा नीमा फजेलीला अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी वेगवान चौकशी आणि कारवाईबद्दल ट्विटरने अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

या सायबर हल्ल्यात क्रिप्टोकरन्सी अर्थात आभासी चलन ट्रान्सफर मॉनिटर करणाऱ्या  Blockchain.com ने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपींनी सांगितलेल्या ईमेलवर जवळपास १२.५८ बिटकॉइन पाठविण्यात आले. त्याचे मूल्य १,१६, ०० डॉलर (जवळपास ८२.२ लाख रुपये) इतके होते. हॅक करण्यात आलेल्या प्रत्येक ट्विटर अकाउंटवरून हॅकर्संनी एक संदेश पाठविला होता. फॉलो करणाऱ्यांना दुप्पट बिटकॉइन्स देण्यात येतील, अशी ऑफर देत बिटकॉइन्सची मागणी केली होती.

आणखी बातम्या....

Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका    

मराठी कुटुंबांसाठी 'संकटमोचक' ठरले मसालाकिंग दातार; 136 महाराष्ट्रीय मायदेशी

डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर 'डिजिटल स्ट्राइक', टिकटॉकवर घातली बंदी  

लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...     

CoronaVirus News : कोरोना व्हायरसच्या लसीवरून राजीव बजाज यांचं मोठं विधान, म्हणाले...    

CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा    

Web Title: 17-year-old accused of masterminding Twitter bitcoin scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.