बापरे! एनर्जी ड्रिंकचं व्यसन पडलं महागात, दिवसाला 'ती' प्यायची 12 कॅन; आता झाली अशी भयंकर अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 05:39 PM2021-09-29T17:39:23+5:302021-09-29T17:41:53+5:30
Girl hospitalized due to addiction of energy drink : एका 17 वर्षीय मुलीला रेड बुल हे ड्रिंक पिण्याची सवय होती. तिला त्याचं व्यसनच लागलं होतं. ती दिवसाला जवळपास 12 कॅन पित असे.
एखादी गोष्ट अतिप्रमाणात झाली की तिचे वाईट परिणाम भोगावे लागतात. व्यसनाचंही तसंच असतं. त्यामुळे खूप मोठं नुकसान होतं. काही दिवसांपूर्वी खूप जास्त कोल्ड ड्रिंक प्यायल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा घडली आहे. एनर्जी ड्रिंक पिणं एका मुलीच्या जीवावर बेतलं आहे. त्यामुळे तिची भयंकर अवस्था झाली आहे. एका 17 वर्षीय मुलीला रेड बुल हे ड्रिंक पिण्याची सवय होती. तिला त्याचं व्यसनच लागलं होतं. ती दिवसाला जवळपास 12 कॅन पित असे. हेच आता तिला खूप भारी पडलं आहे. या सवयीमुळे ती आता रुग्णालयात उपचार घेत असून तिची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.
स्वित्झर्लंडमध्ये ही घटना घडली आहे. 17 वर्षांच्या मॅस्चाला रेड बुल (Red Bull) प्यायला आवडायचं. तिची ही आवड हळूहळू व्यसन बनलं. दिवसाला ती तब्बल 12 कॅन रेड बुल पिऊ लागली. त्यानंतर एक दिवस अचानक की आपल्या शाळेमध्ये बेशुद्ध होऊन पडली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला हार्ट क्रॅम्प्स आल्याचं निदान झालं. क्रॅम्पस येण्याचं मुख्य कारण म्हणजे एनर्जी ड्रिंक होतं. ती नेहमी पित असलेल्या रेड बुलनेच तिची अवस्था भयंकर झाली.
दिवसाला 12 कॅन एनर्जी ड्रिंक प्यायची
मॅस्चाने डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला रेड बुल प्रचंड आवडायचं. ती तिच्या दिवसाची सुरुवातच रेड बुलने करायची. कामादरम्यान ब्रेक घेतल्यानंतरही ती रेड बुल प्यायची. संध्याकाळी मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवतानाही ती रेड बुलच प्यायची. मॅस्चाने डॉक्टरांना दिवसाला 12 कॅन एनर्जी ड्रिंक पित असल्याची माहिती दिली. याता तिला तिची ही आवड महागात पडली आहे. आपल्याप्रमाणे इतरांची अवस्था होऊ नये म्हणून तिने तुम्ही अशी सवय लावून घेऊ नका, असा सल्ला इतरांना दिला आहे.
सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू
मॅस्चाने रुग्णालयातूनच स्वतःचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती हातात रेड बुलचा कॅन घेऊन रुग्णालयातील बेडवर झोपलेली दिसते. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हे खूप पिऊ नका असं म्हटलं आहे. तसेच अशाप्रकारचे ड्रिंक तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. तुमचा जीव धोक्यात घालू शकतात असं सांगत तिने लोकांना सावध केलं आहे. मॅस्चा दिवसाला 12 कॅन रेड बुल पित असल्याचं ऐकून डॉक्टरांना सुरुवातीला धक्काच बसला. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.