कोरियातील विमान अपघातात १७९ जणांचा मृत्यू, फक्त २ जण वाचले; कोणती सीट सुरक्षित असते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 16:22 IST2025-01-01T16:21:52+5:302025-01-01T16:22:53+5:30
काही दिवसापूर्वी उत्तर कोरियामध्ये मोठा विमान अपघात झाला, या घटनेत १७९ जणांचा मृत्यू झाला.

कोरियातील विमान अपघातात १७९ जणांचा मृत्यू, फक्त २ जण वाचले; कोणती सीट सुरक्षित असते?
दक्षिण कोरियाचे एक विमान रविवारी कोसळले, या अपघातामध्ये १७९ जणांचा मृत्यू झाला, तर विमानातील दोन जण या अपघातातून बचावले. वाचलेले दोघेही त्या फ्लाइटमधील अटेंडंट आहेत. बँकॉकहून दक्षिण कोरियाच्या मुआनला जाणाऱ्या जेजू एअरच्या बोइंग ७३७-८०० फ्लाइट ७सी २२१६ मध्ये एकूण १८१ लोक होते. लँडिंग करताना विमान धावपट्टीच्या बाहेर गेले आणि कुंपणाला धडकले, यामुळे या विमानाचा मोठा अपघात झाला.
करोडो शेतकऱ्यांना केंद्राकडून नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट; पहिल्याच कॅबिनेटमध्ये महत्वाचे निर्णय
हे बोईंग विमान १५ वर्षे जुने होते. दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारचा अपघात हा देशातील ३० वर्षांतील सर्वात वाईट विमान अपघातांपैकी एक होता. लँडिंग गियर ओपन झाला नाही, त्यामुळे विमान धावपट्टीवरुन बाजूला गेले आणि भिंतीवर आदळले. यात मोठी आग लागली, यामुळे विमानातील १७९ जणांचा होरपळून मृत्यू झाला पण मोठी गोष्ट म्हणजे त्याच विमानातील दोन फ्लाइट अटेंडंट वाचले, हे दोघेही त्याच विमानाच्या मागील सीटवर बसले होते. दोन जिवंत फ्लाइट अटेंडंट त्यातील एक २५ वर्षीय तर दुसरा ३३ वर्षीय आहेत. यात ते दोन्हीही फक्त जखमी झाले आहेत. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टाइम मॅगझिनने केलेल्या विमान क्रॅशच्या २०१५ च्या मूल्यांकनात असे आढळून आले की, विमानातील सर्वात सुरक्षित जागा मागील बाजूस आहेत, विमानाच्या मागील तिसरा हिस्सा सर्वात सेफ आहे. मासिकाच्या अहवालात मागील बाजूचा मृत्यूचे प्रमाण ३२ टक्के असल्याचे म्हटले आहे. तर, ओळीच्या स्थितीनुसार सर्वात चांगली जागा विमानाच्या मागील बाजूस असलेल्या मधली जागा होती, तिथे मृत्यू दर २८ टक्के आहे.
विमानातील सर्वात धोकादायक जागा विमानाच्या मधली आणि पुढची आसने होती कारण त्यांचा मृत्यू दर अनुक्रमे ३९ आणि ३८% होता. ओळीच्या स्थितीनुसार सर्वात धोकादायक जागा केबिनच्या मधल्या तिसऱ्या भागात असलेल्या आयसल सीट्स होत्या, याचा मृत्यू दर ४४% होता.
एका अहवालानुसार, २००७ मध्ये, तंत्रज्ञान आणि ऑटोमोटिव्ह इनोव्हेशन मासिकाने नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाकडून २० अपघात अहवाल तपासले. यात असे आढळले की, मागील सीटवरील प्रवाशांना अपघातात वाचण्याची ६९ टक्के शक्यता होती. विंगच्या वरती बसलेल्या लोकांसाठी जगण्याची शक्यता ५६% होती आणि पंखांसमोर बसलेल्या लोकांसाठी जगण्याची शक्यता ४९% होती.