१८ महिन्यांत १३ मुले!
By admin | Published: March 22, 2016 03:14 AM2016-03-22T03:14:53+5:302016-03-22T03:14:53+5:30
साधारणत: कुठल्याही स्त्रीच्या प्रसूतीला नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. पण इंग्लंडमध्ये एका महिलेने १८ महिन्यांत १३ मुलांना जन्म दिला आहे. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे?
लंडन : साधारणत: कुठल्याही स्त्रीच्या प्रसूतीला नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. पण इंग्लंडमध्ये एका महिलेने १८ महिन्यांत १३ मुलांना जन्म दिला आहे. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? वास्तवात हे शक्य नाही, पण इंग्लंडमध्ये एका महिलेने हजारो पाऊंडस कमावण्यासाठी कागदोपत्री बनावट मुले दाखवून ९.५८ लाख रुपयांचा प्रशासनाला गंडा घातला.
रेबेका जॉन्स असे या महिलेचे नाव आहे. मँचेस्टरमध्ये राहणाऱ्या या महिलेने दोन मुलांसाठी टॅक्स क्रेडिटस्चा दावा केला होता. त्यानंतर तिने अतिरिक्त लाभ मिळवण्यासाठी १३ मुले दाखवली. पहिल्या ३४ दिवसांत तिने सात मुलांना हजर करून पैसे उकळले. मुलांच्या बनावट नावाने तिने बँकेमध्ये खाती उघडली.
रेबेकाला वास्तवात दोन मुले आहेत. पण नंतर तिने मुलांना जन्म दिल्याचे बनावट दाखवले. (वृत्तसंस्था)