18 फूट लांब पाळीव सापाने घेतला मालकाचा जीव, चार दिवस हॉस्पिटलमध्ये होता भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 04:38 PM2022-08-01T16:38:58+5:302022-08-01T16:41:35+5:30
America : एबीसी न्यूज रिपोर्टनुसार, 27वर्षीय एलियट सेंसमॅन पेलसिल्वेनियाचा राहणारा होता. एलियटटने बोआ क्रॉन्सट्रिक्टर किंवा तसा मिळता जुळता साप पाळला होता.
America : 18 फूट लांब पाळीव सापाने आपल्या मालकाचा जीव घेतला. मालकाचा मुत्यू सापाच्या हल्ल्यानंतर चार दिवसांनी हॉस्पिटलमध्ये झाला. ही व्यक्ती साप आणि अशा जीवांबाबत फार पॅशनेट होता. तो नेहमीच नागरी वस्त्यांमधून सापांना पकडत होता.
एबीसी न्यूज रिपोर्टनुसार, 27वर्षीय एलियट सेंसमॅन पेलसिल्वेनियाचा राहणारा होता. एलियटटने बोआ क्रॉन्सट्रिक्टर किंवा तसा मिळता जुळता साप पाळला होता. या सापाने सेंसमॅनच्या गळ्या घट्ट वेढा दिला होता. ज्यामुळे त्याला एनोक्सिक ब्रेन इंजरी झाली.
सापाने सेंसमॅन असा काही वेढा दिला होता की, मेंदूला होणारा ऑक्सीजनचा सप्लाय बंद झाला. ज्यामुळे सेंसमॅनचा मृत्यू झाला. पोलिसांना सूचना मिळाली होती की, पेनसिल्वेनियातील एका घरात एका व्यक्तीवर सापाने हल्ला केला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते.
साप खूप लांब आणि मोठा असल्यान पोलिसांना सापाला गोळी मारावी लागली. तेव्हाच पोलीस त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊ शकले. जिथे चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. 'द मॉर्निंग कॉल'सोबत बोलताना सेंसमॅनच्या कुटुंबियांनी सांगितलं की, तो नेहमीच रहिवाशी भागांमध्ये साप पकडत होता.