Plane Crash in Nepal काठमांडू विमान दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू, पायलट बचावला; PM घटनास्थळी पोहचले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 01:16 PM2024-07-24T13:16:05+5:302024-07-24T13:41:25+5:30
Plane Crash in Nepal नेपाळमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमुळे देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Plane Crash in Nepal नेपाळच्या काठमांडू येथे त्रिभुवन एअरपोर्टवर टेक ऑफ घेताना प्रवासी विमान क्रॅश झालं आहे. या विमानात १९ प्रवासी होते. या दुर्घटनेत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर एका प्रवाशाचा जीव वाचला आहे. जखमी प्रवाशावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुर्घटनेत पायलटचाही जीव बचावला असून त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे विमान काठमांडू ते पोखरा येथे जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्लेन सौर्य एअरलाईन्स विमान नंबर 9N AME होतं. विमान टेक ऑफ घेताना ते रन वेवरून घसरलं ज्यामुळे भीषण दुर्घटना घडली. अपघातात प्लेनच्या पुढच्या बाजूस आग लागली. या घटनेनंतर पंतप्रधान केपी ओली घटनास्थळी पोहचले होते. ज्या विमानाचा अपघात घडला त्यातील प्रवाशांची यादी समोर आली आहे. प्लेनमध्ये प्रवास करणारे सौर्य एअरलाईन्सचे स्टाफ सदस्य होते.
१ पायलट सुरक्षित, उपचार सुरू
काठमांडू त्रिभुवन एअरपोर्टवर झालेल्या दुर्घटनास्थळी बचाव पथक टीम हजर आहे. रेस्क्यू टीमनं आग नियंत्रणात आणली आहे. १५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. विमान दुर्घटनेत पायलट सुरक्षित असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. उपचारानंतर त्याची चौकशी केली जाऊ शकते.
#UPDATE | Death toll in the Kathmandu plane crash rises to 18.
— ANI (@ANI) July 24, 2024
CRJ7 (Reg-9NAME) of Sourya Airlines took off from Kathmandu at 11:11 am local time during the flight to Pokhara, turned right and crashed at a place on the east side of the runway. It is reported that the fire was… pic.twitter.com/hkTAcI1B1Q
विमान दुर्घटनेनंतर जे फोटो, व्हिडिओ समोर आलेत त्यात विमान आगीत राख झाल्याचं दिसतं. या दुर्घटनेमुळे त्रिभुवन एअरपोर्टवरील विमानसेवेवर परिणाम झाला आहे. अनेक उड्डाणे आणि लँडिंग लखनौ आणि कोलकाता एअरपोर्टच्या दिशेने वळवण्यात आली आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर तातडीने रेस्क्यू टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ११.४० वाजेपर्यंत आग विझवण्यात आली अशी माहिती काठमांडू घाटी पोलीस कार्यालयाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश राज मैनाली यांनी दिली.