प्रेमासाठी काय पण! 18 वर्षांची मुस्कान 55 वर्षीय फारुखच्या प्रेमात, जगाची पर्वा न करता केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 03:50 PM2022-08-29T15:50:50+5:302022-08-29T15:59:12+5:30
मुस्कान नावाची 18 वर्षीय तरुणी 55 वर्षीय फारुख अहमद नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि लग्नही केलं. याच लव्हस्टोरी फारच हटके आहे. गाण्याच्या आवडीमुळे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. प्रेमाचे अनेक भन्नाट किस्से हे सातत्याने समोर येत असतात. अशीच एक अजब प्रेमाची गजब घटना आता समोर आली आहे. एका 18 वर्षीय मुलीने चक्क 55 वर्षीय व्यक्तीशी लग्न केलं आहे. पाकिस्तानमध्ये ही घटना घडली आहे. मुस्कान नावाची 18 वर्षीय तरुणी 55 वर्षीय फारुख अहमद नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि लग्नही केलं. यांची लव्हस्टोरी फारच हटके आहे. गाण्याच्या आवडीमुळे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
पाकिस्तानमधील युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर सैयद बसित अलीने या दोघांची मुलाखत घेतली आहे. फारुख मुस्कानच्या घरासमोरच राहतात. दोघांच्या घरामध्ये एक छोटा रस्ता आहे. दोघे एकमेकांशी बोलू लागले. गाण्यावरून त्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं वाढलं. याचवेळी मुस्कान फारुख यांच्या प्रेमात पडली. त्यानंतर पुढील काही भेटींमध्ये मुस्कान ही बॉबी देओलच्या चित्रपटातील 'ना मिलो हमसे जादा' हे गाणं गाऊन फारुख यांना आपण तुमच्या प्रेमात पडल्याचे संकेत देत होती.
गाण्यामुळे आमच्यातली जवळीक वाढल्याचं या दोघांनी मुलाखतीत सांगितलं आहे. एक दिवस मुस्काननेच फारुख यांना प्रपोज केलं. मुस्कानने प्रेमाची कबुली दिल्यानंतर फारुख यांनीही त्यांनी ती आवडत असल्याचं सांगितलं. नंतर दोघांनी प्रेमविवाह केला. मात्र या विवाहाला कुटुंबीय आणि शेजारी राहणाऱ्या लोकांचा विरोध होता. तरीही दोघांनी एकमेकांवरील प्रेमापोटी सर्वांचा विरोध पत्करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. सध्या या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.