भूमध्य सागरात बोट उलटून 180 निर्वासित बेपत्ता

By admin | Published: January 17, 2017 04:57 PM2017-01-17T16:57:40+5:302017-01-17T16:57:40+5:30

भूमध्य सागरात निर्वासितांना घेऊन जाणारी बोट शनिवारी (दि.14) उलटल्यामुळे जवळपास 180 जण बेपत्ता झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने मंगळवारी दिली आहे.

180 refugees disappeared after boat hit the Mediterranean Sea | भूमध्य सागरात बोट उलटून 180 निर्वासित बेपत्ता

भूमध्य सागरात बोट उलटून 180 निर्वासित बेपत्ता

Next
>ऑनलाइन लोकमत
रोम, दि. 17 - भूमध्य सागरात निर्वासितांना घेऊन जाणारी बोट शनिवारी (दि.14) उलटल्यामुळे जवळपास 180 जण बेपत्ता झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने मंगळवारी दिली आहे. 
लिबियातून 180 हून अधिक निर्वासितांना घेऊन जाणारी बोट शनिवारी उलटली. या बोटीतील 180 जण बेपत्ता झाले असून चार जणांचा मृत्यू झाला, असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय निर्वासित संघटना आणि संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सीने याच बोटीच्या आपत्तीपासून वाचलेल्या चौघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिली आहे. 
बोटीच्या अपघातानंतर हे चौघे दक्षिण इटलीच्या त्रपणी सिसिलिएन किना-यावर धडकले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सर्व निर्वासित शुक्रवारी लिबियातून निघाले असता भूमध्य सागरात ही घटना घडली. दरम्यान, वाचलेल्या चौघांपैकी दोघे इरिट्रियाचे आणि दोघे इथिओपियाचे असल्याचे समजते. 

Web Title: 180 refugees disappeared after boat hit the Mediterranean Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.