प्रेम नाकारलं म्हणून भरला 19 कोटी रुपयांचा खटला, तरुणाचा अनोखा बदला!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 09:29 PM2023-02-02T21:29:33+5:302023-02-02T21:30:51+5:30
...मात्र, समुपदेशनादरम्यान, संबंधित तरुण अटॅचमेंट संपवू शकत नाही, असे लक्षात आल्यानंतर तिने पुन्हा दूर होण्याचे ठरवले. यानंतर तरुणाने तिच्यावर दोन गुन्हे दाखल केले.
सिंगापूरमधील एक अनोख्या प्रकरणाची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे. के. कावशिगन (K. Kawshigan) नावाच्या तरुणाने त्याची मैत्रिण नोरा टॅन (Nora Tan)वर 19 कोटी रुपयांचा खटला भरला आहे. कारण असे की, के. कावशिगन तिच्यावर प्रेम करत होते आणि नोरा त्याला 'केवळ एक मित्र'च मानत होती. यामुळे मानसिक छळ सहन करावा लागल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. तसेच यामुळे त्याच्या कमाई क्षमतेवरही परिणाम झाला, असेही त्याने म्हटले आहे.
यानंतर, संबंधित तरुणीने त्याच्यासोबत समुपदेशन सत्र उपस्थित राहण्यास तयार झाली. यानंतर त्यानेही केस मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, समुपदेशनादरम्यान, संबंधित तरुण अटॅचमेंट संपवू शकत नाही, असे लक्षात आल्यानंतर तिने पुन्हा दूर होण्याचे ठरवले. यानंतर तरुणाने तिच्यावर दोन गुन्हे दाखल केले.
K. Kawshigan आणि नोरा यांची 2016 मध्ये मैत्री झाली. हळूहळू, Kawshigan ला नोराबद्दल रोमँटिक भावना निर्माण झाल्या. पण नोरा या नात्याला नेहमीच मैत्री मानत असे. सप्टेंबर 2020 मध्ये खरी समस्या सुरू झाली. तरुण तिला त्याच्या सर्वात 'जवळची मित्रिण' समजू लागला आणि नोरा त्याला केवळ मित्र समजत होती.
समुपदेशन प्रक्रियेदरम्यान Nora ने म्हटले होते, की तिला अस्वस्थ वाटत आहे. Kawshigan ला हे आवडले नाही. त्यावेळी तो म्हणाला होता की, एकतर त्यांच्या मागण्या मान्य कर अथवा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात कधीही भरून न निघणारे नुकसान सहन करण्यास तयार राहा. दीड वर्ष समुपदेशन करूनही नोराला आपल्याशी संबंध नको आहेत, हे मान्य करायला Kawshigan तयार नव्हता.
केल्या दोन केस -
यानंतर, नोरा त्याच्यापासून पुन्हा दूर झाल्यानंतर त्याने तिच्या विरोधात दोन गुन्हे दाखल केले. पहिला इमोशनल ट्रॉमासाठी 3 मिलियन सिंगापुर डॉलर, म्हणजेच सुमारे 19 कोटी रुपये. तर दुसरा नाते सुधारण्याचा करार मोडल्याबद्ल दंडाधिकारी न्यायालयात 1,372,649.25 चा खटला. यातरुणाने दावा केला आहे, की यासंपूर्ण प्रकारामुळे त्याला मानसिक आघात झाला, लोकांसमोर त्याची प्रतिष्ठा गेली, त्याच्या कमावण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम झाला आणि नैराश्याच्या उपचारासाठी पैसे खर्च झाले. या 3 मिलियन डॉलरच्या उच्च न्यायालयातील खटल्याची सुनावणी 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे.