स्वस्तात सर्जरी पडली महागात, डॉक्टर एकाच चाकूने कापत होता पोट; इंजेक्शनमुळे दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 12:30 PM2023-05-27T12:30:54+5:302023-05-27T12:31:16+5:30
आजकाल लोक आपल्या नैसर्गिक रूपात आनंदी नाहीत. कुणाला सडपातळ व्हायचंय तर कुणाला लठ्ठ व्हायचंय. गोऱ्या लोकांना सावळं व्हायचयं तर सावळ्यांना गोरं.
लोक आपली पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी काम करतात. पण हेही खरं आहे की, अनेक लोक आपले कमावलेले पैसे खर्च करण्याऐवजी सेवा करण्यातही विश्वास ठेवतात. जी एक चांगली बाब आहे. पण काही ठिकाणी पैसे वाचवण्याच्या नादात तुमच्या आरोग्यासोबत खेळ केला जातो. अमेरिकेतून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे दोन व्यक्तीचा मृत्यू ब्रेन इन्फेक्शनमुळे झाला. दोघांनीही अशा डॉक्टरकडून सर्जरी केली जो यात डिस्काउंट देत होता.
आजकाल लोक आपल्या नैसर्गिक रूपात आनंदी नाहीत. कुणाला सडपातळ व्हायचंय तर कुणाला लठ्ठ व्हायचंय. गोऱ्या लोकांना सावळं व्हायचयं तर सावळ्यांना गोरं. लोकांना सुंदर बनवण्यासाठी अनेक सर्जरी सुद्धा आल्या आहेत. पण यासाठी भरमसाठ पैसाही खर्च करावा लागतो. अमेरिकेतील दोन लोकांनी आपला लूक बदलण्यासाठी सर्जरी केली. पण यादरम्यान त्यांनी पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला. ज्याचा परिणाम जीवघेणा ठरला.
लठ्ठपणा दूर करण्यासाठी सर्जरी
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणाऱ्या या दोन लोकांनी लिपोसक्शन केलं होतं. या प्रोसीजरमध्ये डॉक्टर शरीरात जमा झालेली चरबी सर्जरीच्या माध्यमातून दूर करतात. असं सांगितलं जातं की, या ट्रीटमेंटनंतर दोघांनाही फंगल मेनिन्जाइटिस झाला होता. याचं कारण होतं डॉक्टरांकडून वापरण्यात आलेले विना स्वच्छ केलेले इक्विपमेंट्स. ज्या इक्विपमेंट्सने डॉक्टरने दोघांची सर्जरी केली. ते स्टरलाइज म्हणजे स्वच्छ केलेले नव्हते. यामुळे दोघांना इन्फेक्शन झालं आणि त्यांचा मृत्यू झाला.
एकाच सुईने इंजेक्शन
दोघांच्या मृत्यूनंतर डॉक्टरची चौकशी झाली. रूग्णांना आकर्षित करण्यासाठी तो फार जास्त डिस्काउंट देत होता. पण जेव्हा चौकशी झाली तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या. हा डॉक्टर स्वच्छतेची अजिबात काळजी घेत नव्हता. सोबतच एकाच सुईने अनेक रूग्णांना इंजेक्शन देत होता. त्यांना अॅनेस्थेशिया देणारी सुई सुद्धा एकच वापरत होता.
Centres for Disease Control and Prevention (CDC) च्या रिपोर्टनुसार, दरवर्षी साधारण 12 लाख लोक मेक्सिकोमध्ये प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी जातात. इतर ठिकाणांपेक्षा इथे प्रोसीजर स्वस्त आहे. पण याचा परिणाम जीवघेणा ठरू शकतो. हे या घटनेतून स्पष्ट झालं आहे.