हवेत २ विमानांची टक्कर टळली, शेकडाे बचावले; नेपाळमधील घटना, वाहतूक नियंत्रक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 08:22 AM2023-03-27T08:22:04+5:302023-03-27T08:22:30+5:30

कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल त्यांच्यावर नेपाळ नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाने (सीएएएन) ही कारवाई केली.  

2 planes collide in mid-air, hundreds saved; Incident in Nepal, traffic controller suspended | हवेत २ विमानांची टक्कर टळली, शेकडाे बचावले; नेपाळमधील घटना, वाहतूक नियंत्रक निलंबित

हवेत २ विमानांची टक्कर टळली, शेकडाे बचावले; नेपाळमधील घटना, वाहतूक नियंत्रक निलंबित

googlenewsNext

काठमांडू : एअर इंडिया व नेपाळ एअरलाइन्सची दोन विमाने आकाशात परस्परांच्या खूप नजीक आली होती. मात्र, सुदैवाने त्यांची टक्कर झाली नाही व शेकडो प्रवाशांचे प्राण बचावले. काठमांडू विमानतळावर शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेऊन नेपाळमधील दोन हवाई वाहतूक नियंत्रकांना निलंबित करण्यात आले आहे. कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल त्यांच्यावर नेपाळ नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाने (सीएएएन) ही कारवाई केली.  (वृत्तसंस्था) 

तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, एक जण जखमी

तटरक्षक दलाच्या एका हेलिकॉप्टरने रविवारी कोचीन आंतरराष्ट्रीय विमातळावरील हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते कोसळले. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातानंतर कोचीन विमानतळावरील हवाई वाहतूक दोन तास बंद ठेवली होती. तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. 

Web Title: 2 planes collide in mid-air, hundreds saved; Incident in Nepal, traffic controller suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.