क्रूर हुकूमशहा! नाटक पाहिले म्हणून २ विद्यार्थ्यांना लोकांच्या जमावासमोर फाशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 09:04 AM2022-12-07T09:04:03+5:302022-12-07T09:04:20+5:30

उ. कोरियाच्या रियांगंग प्रांतातील एका हायस्कूलमध्ये या दोन्ही विद्यार्थ्यांची भेट झाली. इथे दोघांनी दक्षिण कोरियन व अमेरिकन नाटके आणि चित्रपट पाहिले.

2 students hanged in front of crowd for watching drama in North Korea | क्रूर हुकूमशहा! नाटक पाहिले म्हणून २ विद्यार्थ्यांना लोकांच्या जमावासमोर फाशी 

क्रूर हुकूमशहा! नाटक पाहिले म्हणून २ विद्यार्थ्यांना लोकांच्या जमावासमोर फाशी 

googlenewsNext

सियोल : दक्षिण कोरियामध्ये केलेले नाटक पाहिले म्हणून दोन शाळकरी विद्यार्थ्यांना उत्तर कोरिया सरकारने फाशीची शिक्षा दिली आहे. या विद्यार्थ्यांचे वय १५-१६ वर्षे होते. या दोघांना भर गर्दीत सार्वजनिकरीत्या गोळ्या घालण्यात आल्या.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्याला फाशी पाहण्यास भाग पाडले गेले. राष्ट्राध्यक्ष किम जोंग उनच्या अधिकाऱ्यांनी हेसन शहरात राहणाऱ्या लोकांना रिकाम्या मैदानात जमण्यास सांगितले. येथे काही अधिकाऱ्यांनी जमावासमोर विद्यार्थ्यांना फाशीची शिक्षा दिली आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

काय होता आरोप? उ. कोरियाच्या रियांगंग प्रांतातील एका हायस्कूलमध्ये या दोन्ही विद्यार्थ्यांची भेट झाली. इथे दोघांनी दक्षिण कोरियन व अमेरिकन नाटके आणि चित्रपट पाहिले. दोघांवरही ही नाटके इतरांना दाखवल्याचा आरोप होता. दोघांनी कोरियन नाटके त्यांच्या मित्रांमध्ये वाटलीही होती.

Web Title: 2 students hanged in front of crowd for watching drama in North Korea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.