विमान अपघातातील मृतांच्या वारसांना मसालाकिंग दातार यांचे २० लाखांचे साह्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 02:53 AM2020-08-18T02:53:46+5:302020-08-18T02:53:52+5:30

विमान दुर्घटनेत वैमानिक, सह-वैमानिक व प्रवाशांसह १८ जण मृत्युमुखी पडले.

20 lakh assistance from Masalaking Datar to the heirs of those killed in the plane crash | विमान अपघातातील मृतांच्या वारसांना मसालाकिंग दातार यांचे २० लाखांचे साह्य

विमान अपघातातील मृतांच्या वारसांना मसालाकिंग दातार यांचे २० लाखांचे साह्य

Next

दुबई : कोझिकोडे विमान अपघातातील मृतांच्या वारसांना वैयक्तिक साह्य म्हणून २० लाख रुपयांचा साह्य निधी देण्याचा संकल्प अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी जाहीर केला आहे. विमान दुर्घटनेत वैमानिक, सह-वैमानिक व प्रवाशांसह १८ जण मृत्युमुखी पडले.
डॉ. दातार यासंदर्भात म्हणाले, ‘या विमानाचे सारथ्य भारतीय हवाई दलातून निवृत्ती घेऊन एअर इंडियात आलेले, अत्यंत अनुभवी व निष्णात वैमानिक कॅ प्टन दीपक वसंत साठे करीत होते. ते भारतीय हवाईदलाचे उत्कृष्ट व गौरवपूर्ण कामगिरी बजावलेले अधिकारी होते. माझे वडील दिवंगत महादेव दातार हेसुद्धा भारतीय हवाई दलात अधिकारी होते. त्यामुळे मला या दलाविषयी प्रबळ आत्मीयता आहे. विमान अपघाताची बातमी कानी पडताच त्यातील मृतांसाठी मदत करण्याची ऊर्मी मनात दाटून आली. या दुर्दैवी विमान फेरीतील अनेक प्रवासी परदेशातील त्यांचे रोजगार गमावलेले होते. अनेक जण व्हिजिट व्हिसाची मुदत संपल्यामुळे मायदेशी परत येत होते. अनेकांपुढे आर्थिक विवंचना होत्या. अशा स्थितीत मृत प्रवाशांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांवरील किमान आर्थिक दडपण काहीसे हलके व्हावे म्हणून मी हा पुढाकार घेतला आहे. एअर इंडियाच्या आपत्ती व्यवस्थापन संघाशी थेट समन्वय साधून ही मदत गरजू लोकांच्या हाती पडेल यासाठी प्रयत्न करीत आहे. भारतीय कॉन्सुलेटचा या मोहिमेसाठीही पाठिंबा मिळत आहे.
डॉ. दातार हे सध्या आणखी एका सामाजिक मदत उपक्रमात व्यग्र आहेत. कोविड-१९ साथीमुळे अरब देशांत अडकून पडलेल्या गरजू भारतीयांना मायदेशी सुखरूप पोहोचविण्यासाठी त्यांनी स्वनिधीतून दहा लाख दिºहॅमहून अधिक खर्च केला आहे. आतापर्यंत त्यांनी ३८०० हून अधिक भारतीयांना घरी सुरक्षित पोहोचवले आहे. गरजू भारतीय कामगारांच्या विमान तिकिटाचा व मोफत वैद्यकीय चाचणीचा खर्च डॉ. दातार उचलत आहेत. याखेरीज खाद्यपदार्थांच्या मोफत कीट पुरवणे व त्यांच्यासाठी मोफत क्वारंटाईनची व्यवस्था करणे, यासाठीही ते खर्च करीत आहेत.

Web Title: 20 lakh assistance from Masalaking Datar to the heirs of those killed in the plane crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.