२० वर्षीय तरूणीने विमानात दिला बाळाला जन्म, मग टॉयलेटमध्ये जाऊन केलं 'हे' धक्कादायक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 01:01 PM2022-01-04T13:01:52+5:302022-01-04T13:07:47+5:30
काही घटना विचार करायलाही भाग पाडतात की, असं काय झालं असेल की, आजच्या काळात असंही होतं? अशीच एक धक्कादायक आणि विचार करायला भाग पाडणारी घटना समोर आली आहे.
सोशल मीडियावर नेहमीच अशा काही बातम्या समोर येतात, ज्या वाचून व्यक्ती आतून हादरून जातात. इतकंच नाही तर विचार करायलाही भाग पाडतात की, असं काय झालं असेल की, आजच्या काळात असंही होतं? अशीच एक धक्कादायक आणि विचार करायला भाग पाडणारी घटना समोर आली आहे.
एका आईने तिच्या बाळाला जन्म दिल्यावर लगेच आपल्यापासून वेगळं केलं. इतकंच नाही तर आपल्या काळजाच्या तुकड्याला आईने डस्टबिनमध्ये म्हणजे कचऱ्याच्या पेटीत फेकलं. त्यानंतर पोलिसांनी या निर्दयी आईला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार विमानात घडला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेडागास्करची (Madagascar) एक २० वर्षीय तरूणी एअर मॉरीशसच्या (Mauritius plane) विमानाने प्रवास करत होती. ही २० वर्षांची तरूणी १ जानेवारीला सर सीवोसागुर रामगुलाम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली होती.
विमानाच्या स्टाफला तिच्यावर संशय आला होता की, तिने एका बाळाला जन्म दिला. यानंतर एअरफोर्स ऑफिसरने रूटीन कस्टम चेक दरम्यान वॉशरूमही चेक केलं. तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांना धक्का बसला. त्यांना दिसलं की, वॉशरूममधील कचरा पेटीत एक बाळ पडून आहे. हे बाळ टॉयलेट पेपरने गुंडाळलेलं आणि रक्ताने माखलेलं आहे.
अधिकाऱ्यांनी बाळाला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि त्याच्यावर उपचार सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसाार, बाळ पूर्णपणे ठीक आहे. यानंतर एका संशयित महिलेला पोलिसांनी पकडलं आणि ते बाळ तिचं आहे का असं विचारलं. तेव्हा तिने बाळ तिचं नसल्याचं सांगितलं. पण नंतर मेडिकल चेकअप नंतर हे स्पष्ट झालं की, ते बाळ तिचंच आहे. महिला अजूनही पोलिसांच्या कस्टडीत आहे.
दोन वर्ष वर्क परमिटवर मॉरीशसला आलेल्या तरूणीची हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्यावर चौकशी केली जाईल. तिच्यावर नवजात बाळाला सोडण्याचा आरोप लावण्यात आला आहे.