भू्रणहत्येवरून भारतीय महिलेस २० वर्षांची शिक्षा

By Admin | Published: April 3, 2015 11:33 PM2015-04-03T23:33:36+5:302015-04-03T23:33:36+5:30

: अमेरिकेतील इंडियाना प्रांतात राहणाऱ्या भारतीय महिलेने गर्भपात झाल्याचा दावा करून भ्रूणहत्या केल्याचा आरोप करीत अमेरिकन न्यायालयाने

20 years of Indian education on Indian soil from mohantage | भू्रणहत्येवरून भारतीय महिलेस २० वर्षांची शिक्षा

भू्रणहत्येवरून भारतीय महिलेस २० वर्षांची शिक्षा

googlenewsNext

वॉशिंग्टन : अमेरिकेतील इंडियाना प्रांतात राहणाऱ्या भारतीय महिलेने गर्भपात झाल्याचा दावा करून भ्रूणहत्या केल्याचा आरोप करीत अमेरिकन न्यायालयाने तिला २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेमुळे अमेरिकेत नवा वाद उसळला असून, भावी मातांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेला कायदा महिलांना गुन्हेगार ठरविण्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला आहे.
पूर्वी पटेल (३३) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव असून, तिच्यावर भ्रूणहत्या व अवलंबून असणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. भ्रूणहत्येसाठी तिला ६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, ती २० वर्षांच्या शिक्षेबरोबर भोगायची आहे.
पूर्वी पटेलने आपला गर्भपात करण्यासाठी हाँगकाँगहून औषधे आणली होती. अमेरिकेत स्वत:चा गर्भपात केल्याच्या आरोपावरून अटक झालेली पूर्वी ही पहिली महिला नाही; पण भ्रूणहत्येच्या आरोपासाठी दोषी ठरवून शिक्षा झालेली मात्र ती पहिली महिला आहे. २०१३ साली जुलै महिन्यात पूर्वी पटेल एका रुग्णालयात तातडीच्या सेवेसाठी गेली. तिला रक्तपात होत होता.
तिने स्वत: गरोदर असल्याचा इन्कार केला; पण आपला गर्भपात झाला व मृत मुलाचा गर्भ आपण एका पिशवीत घालून कचऱ्यात फेकला असे सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: 20 years of Indian education on Indian soil from mohantage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.