भयंकर! युद्ध रणनीती म्हणून सैनिकांनी केला २२१ बालकांवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 20:42 IST2025-03-05T20:41:06+5:302025-03-05T20:42:27+5:30
युद्ध रणनीतीचा भाग म्हणून २२१ अल्पवयीनांवर अत्याचार करण्यात आले. यात मुलींसोबत मुलांचादेखील समावेश असल्याची माहिती युनिसेफने दिली.

भयंकर! युद्ध रणनीती म्हणून सैनिकांनी केला २२१ बालकांवर बलात्कार
वॉशिंग्टन : हिंसाचाराने होरपळणाऱ्या सुदानमध्ये २०२४ या चिमुकल्यांवरदेखील सैनिकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापैकी काही पीडितांचे वय एक वर्ष आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
युद्ध रणनीतीचा भाग म्हणून २२१ अल्पवयीनांवर अत्याचार करण्यात आले. यात मुलींसोबत मुलांचादेखील समावेश असल्याची माहिती युनिसेफने दिली. उत्तर आफ्रिकन देशात लिंगआधारित हिंसाचारावर काम करणाऱ्या संस्थेच्या हवाल्याने युनिसेफने संबंधित माहिती दिली.
सुदानमध्ये एप्रिल २०२३ पासून देशाचे लष्कर व त्यांचा प्रतिस्पर्धी निमलष्करी गट 'रॅपिड सपोर्ट फोर्स' यांच्यात संघर्ष सुरू आहे. या हिंसाचारात २० हजारांहून अधिक लोक ठार झाले आहेत.
रुग्णालयातून १३० रुग्णांचे बंडखोरांनी केले अपहरण
डकार : पूर्व कांगोतील प्रमुख शहरातील दोन रुग्णालयांवर हल्ला करत रखांडा समर्थक 'एम २३' या बंडखोरांनी किमान १३० रुग्णांचे अपरहण केले.
गोमा शहरातील रुग्णालयांवर हल्ला करत बंडखोरांनी त्यांचे अपहरण केल्याची माहिती संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्याने दिली. या वर्षाच्या सुरुवातीला बंडखोरांनी या शहरावर ताबा मिळवला आहे.
रुग्णालयात भरती झालेले लोक कांगो लष्कराचे सैनिक किंवा सरकार समर्थक व झालेंडो मिलिशियाचे सदस्य असल्याचा संशय आल्याने बंडखोरांनी त्यांचे अपहरण केल्याचा दावा करण्यात येत आहे.