भारतीय कामगारांना २ कोटी डॉलरची भरपाई

By Admin | Published: July 17, 2015 04:32 AM2015-07-17T04:32:57+5:302015-07-17T04:32:57+5:30

कॅटरिना चक्रीवादळानंतर तेल रिंग व इतर सुविधांच्या दुरुस्तीसाठी अमेरिकेत आणण्यात आलेल्या २०० भारतीय कामगारांची फसवणूक व त्यांचे शोषण केल्याच्या प्रकरणात आरोपी

$ 200 million compensation to Indian workers | भारतीय कामगारांना २ कोटी डॉलरची भरपाई

भारतीय कामगारांना २ कोटी डॉलरची भरपाई

googlenewsNext

न्यूयॉर्क : कॅटरिना चक्रीवादळानंतर तेल रिंग व इतर सुविधांच्या दुरुस्तीसाठी अमेरिकेत आणण्यात आलेल्या २०० भारतीय कामगारांची फसवणूक व त्यांचे शोषण केल्याच्या प्रकरणात आरोपी कंपनी व कामगारांत दोन कोटी डॉलरच्या भरपाईवर तडजोड झाली आहे. अमेरिकी इतिहासातील कामगारांच्या तस्करीचे हे सर्वांत मोठे प्रकरण आहे.
सिग्नल इंटरनॅशनलविरुद्ध कामगारांच्या तस्करीच्या अनेक प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी हा समझोता करण्यात आला आहे. एका केंद्रीय ज्युरींनी भारतीय कामगारांची फसवणूक, शोषण केल्याप्रकरणी सिग्नलला अलीकडेच दोषी ठरविले होते. २००५ मध्ये कॅटरिना वादळामुळे हानी झालेल्या तेल रिंग, इतर सुविधांच्या दुरुस्तीसाठी या कामगारांना भारतातून आणण्यात आले होते. वेल्डर, प्लंबर आणि इतर प्रकारचे काम मिळावे यासाठी कामगारांनी कंपनी आणि एका वकिलाला १० ते २० हजार डॉलर किंवा त्याहूनही अधिक रक्कम भरती शुल्क व इतर शुल्क म्हणून दिली होती. या कंपनीने भारतीय कामगारांना चांगल्या नोकऱ्या, ग्रीन कार्ड आणि त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना अमेरिकेत घर देण्याचेही आश्वासन दिले होते. अनेक कामगारांची कंपनीने भरती व इतर शुल्कापोटी मागितलेली रक्कम देण्याची ऐपत नव्हती. त्यामुळे त्यांनी मालमत्ता विकून किंवा कुटुंबियांवर कर्जाचा बोजा टाकून ही रक्कम भरली होती, असे या खटल्यात कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदर्न पॉवर्टी लॉ सेंटरने सांगितले.
होते नव्हते ते विकून अथवा कर्ज काढून हे कामगार २००६ मध्ये अमेरिकेत आले. तेव्हा ग्रीन कार्ड किंवा कायम रहिवासाचा परवाना मिळणार नसल्याचे त्यांना कळाले. हा त्यांच्याकरिता पहिला मोठा धक्का होता. त्यानंतर त्यांना दयनीय अवस्थेतील कामगार छावण्यांत ठेवून राहण्याच्या मोबदल्यात दरमहा १,०५० डॉलर देण्यास भाग पाडले गेले होते. (वृत्तसंस्था)

 

 

Web Title: $ 200 million compensation to Indian workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.