नायजेरियात आत्मघाती हल्ल्यात २१ जण ठार

By admin | Published: November 28, 2015 09:13 AM2015-11-28T09:13:31+5:302015-11-28T09:13:31+5:30

नायजेरियातील कानो शहरात शिया मुस्लिमांच्या मिरवणुकीवर (झुलूस) झालेल्या आत्मघातकी बॉंबस्फोटात २१ जण ठार झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

21 dead in Nigeria suicide bombing | नायजेरियात आत्मघाती हल्ल्यात २१ जण ठार

नायजेरियात आत्मघाती हल्ल्यात २१ जण ठार

Next

ऑनलाइन लोकमत,
नायजेरिया(कानो), दि. २८ - नायजेरियातील कानो शहरात शिया मुस्लिमांच्या मिरवणुकीवर (झुलूस) झालेल्या आत्मघातकी बॉंबस्फोटात २१ जण ठार झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत. काल रात्री उशीरा हा हल्ला झाला होता. कानो शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. दरम्यान या हल्ल्याची अद्याप कुठल्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. इस्लामिक मूव्हमेंट ऑफ नायजेरियाच्या समर्थकांनी काढलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या आत्मघाती हल्लेखोराने हा बॉंबस्फोट घडवून आणला. या हल्ल्यात २१जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. हल्ल्यानंतरही मिरवणूक पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 21 dead in Nigeria suicide bombing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.