२१वे शतक आशियाचे - नरेंद्र मोदी
By admin | Published: May 16, 2015 10:27 AM2015-05-16T10:27:13+5:302015-05-16T10:33:00+5:30
२१ वे शतक आशियाचे असून भारत-चीनच्या नेतृत्वाखाली या शतकात जगाची प्रगती होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
शांघाय दि. १६ - २१ वे शतक आशियाचे असून भारत-चीनच्या नेतृत्वाखाली या शतकात जगाची प्रगती होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. शांघायमध्ये भारत-चीन बिझनेस फोरममध्ये बोलताना मोदींनी दोन्ही देशांतील व्यापा-यांमध्ये संपर्क व व्यापार वाढणे दोन्ही देशांच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले.
भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने बदलत असून जगभरातील व्यापा-यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले जात आहे, असे ते म्हणाले. चीन व भारताने आर्थिक प्रगतीसाठी एकत्र काम करणे ही काळाची गरज असून दोन्ही देशांना अनेक नवे मुक्काम गाठता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जगासाठी उत्पादन करता यावे म्हणून 'मेक इन इंडिया' मोहीम सुरू केल्याचे सांगत भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या फोरम दरम्यान दोन्ही देशांदरम्यान २२ मिलियन डॉलर मूल्याच्या २१ करारांवर स्वाक्ष-या करण्यात आल्या.