२१ वे शतक आशियाई देशांचे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By admin | Published: November 21, 2015 10:51 AM2015-11-21T10:51:37+5:302015-11-21T12:30:31+5:30
आशियाई देशांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय असून २१ वे शतक हे आशियाई देशांचेच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई शिखर संमेलनात केले
Next
>ऑनलाइन लोकमत
क्वालालांपूर, दि. २१ - भारत व आसिआन देश हे नैसर्गिक मित्र असून, फार पूर्वीपासून आमचे नाते जोडले गेले आहे, त्यात कोणताही दुरावा नाही. आशियाई देशांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय असून २१ वे शतक हे आशियाई देशांचेच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई शिखर संमेलनात केले. मलेशिया व सिंगापूरच्या दौ-यावर असलेले पंतप्रधान मोदी आज दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसिआन) शिखर परिषदेत बोलत होते.
आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेले आशियाई देश एकत्र येऊन आर्थिक स्थिती आणखी सुधारू शकतात, २१ वे शतक हे आशियाचे बनवण्याची जबाबादारी भारताची अाहे, असे ते म्हणाले.
भारताचा आर्थइक आलेख पाहता, आम्ही पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होऊन ती मजबूत होत असल्याचे दिसत आहे, असे मोदी म्हणाले. भारतात या व येत्या काही वर्षांत आर्थिक विकास पहायला मिळेल अशी आशा जागतिक बँक व आयएमएफनेही व्यक्त केल्याचे सांगत आमच्या देशातील आर्थिक बदलाचे वारे अनुभवण्यासाठी आपणही यावे, असे निमंत्रण मोदींनी परिषदेत दिले.
गेल्या १८ महिन्यात देशाचा विकास तर झालाच पण महागाई कमी झाली आहे. गेल्या वर्षभरात जन-धन योजनेअंतर्गत तब्बल १९ कोटी नागरिकांची बँक खाती सुरू करण्यात आली आहेत. भारताला वैश्विक निर्मिती केंद्र बनवण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अर्थव्यवस्थेला मजबूती येत असून, कृषी क्षेत्रच आमचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. कराच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नात देशांतर्गात उत्पन्नात वाढ झाली आहे. व्याजदरांत मोठी कपात झाली आहे. त्यामुळे भारताचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे मोदी म्हणाले. भारतात रस्त्यांचा विकास झपाट्याने होत असून, सध्या दररोज १४ ते २३ किमी अंतराचे महामार्ग बांधण्यात येत आहेत. गेल्या अनेक वर्षांची वर्षांची परंपरा मोडीत काढून आम्ही भारतात परकीय गुंतवणुकीला चालना दिल्याचेही मोदींनी नमूद केले.