बुर्ज खलिफात मेकॅनिकचे २२ फ्लॅट
By admin | Published: September 13, 2016 04:07 AM2016-09-13T04:07:27+5:302016-09-13T04:07:27+5:30
जगातील सर्वात उंच इमारत अशी ओळख असलेल्या बुर्ज खलिफा इमारतीमध्ये मूळच्या एका मेकॅनिक व्यावसायिकाचे तब्बल २२ फ्लॅट आहेत
शारजा : जगातील सर्वात उंच इमारत अशी ओळख असलेल्या बुर्ज खलिफा इमारतीमध्ये मूळच्या एका मेकॅनिक व्यावसायिकाचे तब्बल २२ फ्लॅट आहेत. जॉर्ज व्ही नेरियापरम्बिल असे त्यांचे नाव असून, तिथेच आणखी काही फ्लॅट घेण्याचे त्याचे स्वप्न आहे.
केरळमध्ये त्यांचा जन्म झाला आहे. बुर्ज खलिफाच्या ४९ व्या मजल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘मी स्वप्न पाहणारा माणूस आहे आणि पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचे मी पूर्ण प्रयत्न करतो. त्यामुळे मी स्वप्न पाहणे कधीही थांबवत नाही आणि थांबवणारही नाही. मला या इमारतीत परवडणाऱ्या किमतीत आणखी काही फ्लॅट्स मिळाले, तर मी तेही विकत घ्यायला तयार आहे.’
केरळमध्ये मेकॅनिक म्हणून कामला सुरुवात केलेल्या नेरियापरम्बिल यांनी १९७६ साली दुबई गाठली आणि तिथे जीईओ नावाची एसीची कंपनी सुरू
केली.