भारतीयासह २२ जण बेपत्ता

By admin | Published: January 17, 2015 02:42 AM2015-01-17T02:42:23+5:302015-01-17T02:42:23+5:30

चीनची सर्वांत लांब नदी म्हणून ओळख असलेल्या यांगत्सी नदीत प्रवास करणाऱ्या टगबोटीला अपघात झाल्यामुळे २२ लोक बेपत्ता

22 Indians missing with Bharti | भारतीयासह २२ जण बेपत्ता

भारतीयासह २२ जण बेपत्ता

Next

शांघाय : चीनची सर्वांत लांब नदी म्हणून ओळख असलेल्या यांगत्सी नदीत प्रवास करणाऱ्या टगबोटीला अपघात झाल्यामुळे २२ लोक बेपत्ता असून, त्यात एक भारतीय आहे. चीनचा पूर्वेकडील प्रांत जियांग्त्सू प्रांतात ही दुर्घटना घडली असून, टगबोटीची चाचणी घेण्यासाठी २५ प्रवासी बोटीत बसले होते. यातील तीन जणांना वाचविण्यात आले असून, २२ जण बेपत्ता आहेत.
बोट बुडाली तेव्हा त्यावर आठ परदेशी नागरिक त्यावर काम करीत होते. शांघाय येथील भारताचे कौन्सल जनरल नवीन श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार , बेपत्ता झालेला भारतीय नागरिक सिंगापूरचा रहिवासी होता. बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी मोहिम सुरू आहे.


 

 

Web Title: 22 Indians missing with Bharti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.