रुग्णालयाच्या आगीत २३ ठार
By admin | Published: December 13, 2015 10:37 PM2015-12-13T22:37:24+5:302015-12-13T22:37:24+5:30
दक्षिण रशियातील मनोरुग्णांच्या रुग्णालयाला लागलेल्या आगीत २३ जण ठार झाले. जखमी २० जणांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे, असे आणीबाणी मंत्रालयाने रविवारी सांगितले.
Next
मॉस्को : दक्षिण रशियातील मनोरुग्णांच्या रुग्णालयाला लागलेल्या आगीत २३ जण ठार झाले. जखमी २० जणांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे, असे आणीबाणी मंत्रालयाने रविवारी सांगितले.
या रुग्णालयाची इमारत लाकडाने बनविलेली होती. ती आगीत नष्ट झाली. वोरोनझेक प्रांतातील अल्फेरोव्हका खेड्यातील या रुग्णालयाला शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आग लागली. आग कशामुळे लागली हे समजले नाही. अग्निशमन व आणीबाणी विभागाचे तब्बल ४४० कर्मचारी ८० वाहनांसह घटनास्थळी दाखल झाले व त्यांना आग विझविण्यासाठी तीन तास लागले. आगीच्या घटनांना प्रतिबंध करण्याकडे अधिकाऱ्यांचे नेहमी दुर्लक्ष असते. (वृत्तसंस्था)