बोको हरामच्या हल्ल्यात २४ ठार

By Admin | Published: May 27, 2014 06:03 AM2014-05-27T06:03:28+5:302014-05-27T06:03:28+5:30

बोको हरामच्या दहशतवाद्यांनी नायजेरियातील एका गावावर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात कमीत कमी २४ जण मारले गेले

24 killed in Boko Haram attack | बोको हरामच्या हल्ल्यात २४ ठार

बोको हरामच्या हल्ल्यात २४ ठार

googlenewsNext

कानो : बोको हरामच्या दहशतवाद्यांनी नायजेरियातील एका गावावर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात कमीत कमी २४ जण मारले गेले. ईशान्य नायजेरियात गेल्या काही महिन्यांपासून बोको हरामच्या प्राणघातक हल्ल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. रविवारी मोटारसायकवर आलेल्या या दहशतवाद्यांनी बोर्नो राज्याच्या कामूया गावाला लक्ष्य केले. हल्लेखोरांनी आठवडी बाजारात आलेल्या स्थानिक नागरिकांवर बेछुट गोळीबार केला. गेल्या महिन्यात २०० हून अधिक शालेय विद्यार्थिनींच्या अपहरणानंतर बोको हरामच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी गावात जाणारे सर्व रस्ते बंद केले. लोकांवर बेछुट गोळाबार केला. यात अधिकतर शेजारच्या गावातील व्यापारी मारले गेले. या हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर पसार झाले, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. (वृत्तसंस्था) दहशतीच्या छायेखाली असलेल्या या गावातील अधिकतर रहिवाशांनी आणखी हल्ल्यांच्या भीतीने शेजारच्या शहरात आपला मुक्काम हलविला आहे. बोको हरामचे दहशतवादी गावावर हल्ला चढवून रहिवाशांच्या हत्या करतात, अन्नधान्याचा साठा लुटून घरांना आग लावून पसार होतात, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. (वृत्तसंस्था) —————————- जगभराच्या नजरा नायजेरियावर असताना अशा प्राणघातक हल्ल्यांच्या माध्यमातून बोको हराम आपली दहशत निर्माण करत आहे. दुसरीकडे या हल्ल्यांमुळे नायजेरियन सैन्यांच्या कमजोर कडीकडेही लक्ष वेधले जात आहे. गेल्या मेपासून बोर्नो आणि शेजारच्या दोन राज्यांत आणीबाणीची स्थिती उद्भवलेली आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवसांत झालेल्या तीन वेगवेगळ््या हल्ल्यांत ५० हून अधिक जण मारले गेले. यापैकी दोन हल्ले ईशान्य नायजेरियातील बोर्नो राज्याच्या चिबोक शहराजवळ झाले. येथूनच शालेय विद्यार्थिनींचे अपहरण झाले होते.

Web Title: 24 killed in Boko Haram attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.