त्या सेल्फीमुळे 25 वर्षीय महिलेला केली अटक
By admin | Published: March 26, 2017 09:01 PM2017-03-26T21:01:46+5:302017-03-26T21:09:55+5:30
सध्या सर्वत 'सेल्फी'चे वेड पसरले असून प्रत्येक क्षण कॅमे-यात कैद करण्यासाठी तरूणाईची धडपड सुरू असते. मात्र या सेल्फीमुळे एका 25 वर्षीय महिलेला तुरुंगात जाव लागलं आहे
ऑनलाइन लोकमत
नई दिल्ली, दि. 26 - सध्या सर्वत्र 'सेल्फी'चे वेड पसरले असून प्रत्येक क्षण कॅमे-यात कैद करण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू असते. मात्र या सेल्फीमुळे एका 25 वर्षीय महिलेला तुरुंगात जावं लागलं आहे. इंग्लंडमधील मँचेस्टर शहरात राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेने एक सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केली. पेरिस कोनोली असे त्या महिलेचे नाव असून तिला चार वर्षाचा एक मुलगा आहे.
पेरिस कोनोलीला सेल्फी घेण्याची क्रेज आहे. जिथे जाईल तिथे सेल्फी घेत असते. या महिलेने फेब्रुवारीत एक सेल्फी सोशल मीडियावर अपलोड केली होती. बेडरूममध्ये घेतलेल्या या सेल्फीमध्ये कॅनबिस (गांजा)चे रोप असल्याचे दिसतेय. तिच्या सेल्फीतील गांजाच्या रोपाकडे पाहून एकाने सरळ पोलिसात तक्रार केली.
पोलिसांनी पेरिसची सेल्फी पाहून तिच्या घरी छापा टाकला. छाप्यामध्ये पोलिसांना पेरिसच्या घरातून 16 गांजाची रोपे मिळाली, तसेच ड्रग्जची पाकिटेही पोलिसांनी जप्त केली. गांजाची रोपे आणि ड्रग्जच्या पाकिटासोबतचं पोलिसांनी पेरिसला अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पेरिसला 16 महिन्यांपर्यंत 180 तास एकही रुपया न घेता सामाजिक काम करण्याची शिक्षा सुनावली.
इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाची अकांऊट पेरिस कोनोलीच्या हॉट फोटोने भरलेलं आहे. पेरिस स्वतःला किम कदार्शियन समजते आणि तिच्यासारखे फोटोशूट करत असते. ड्रग्जची लथ लागलेली पेरिस रोज एक तरी सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट करत असते.