तैवानच्या आकाशात चोहूबाजुंनी २६ चिनी लढाऊ विमाने घुसली; हल्लाच चढवल्याच्या शक्यतेने खळबळ उडाली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 04:28 PM2023-03-19T16:28:28+5:302023-03-19T16:29:22+5:30
चीनने या महिन्यात आतापर्यंत 67 नौदल जहाजे आणि 266 लष्करी विमाने तैवानच्या समुद्री- हवाई हद्दीत पाठविली आहेत.
चीन आणि तैवानमध्ये सुरु असलेला तणाव कमी होण्याचे नाव घेत नाहीय. शनिवारी चीनची थोडी थोडकी नव्हे तर २६ लढाऊ विमाने आणि चार युद्धनौका तैवानच्या हद्दीत घुसल्याने मोठी खळबळ उडाली होती. एकप्रकारे हल्लाच केल्यासारखे वातावरण निर्माण केले गेले होते. तैवानच्या प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली आहे.
तैवानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयानुसार पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ची 26 विमाने तैवानच्या एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन (एडीआयझेड) मध्ये घुसली होती. चार चेंगडू जे-10 लढाऊ विमाने, चार शेनयांग जे-16 लढाऊ विमाने, एक सीएच-4 ड्रोन आणि एक हार्बिन बीझेडके-005 ड्रोनने ही घुसखोरी केली. हार्बिनमधील आणखी एक ड्रोन तैवानच्या हवाई संरक्षण शोध क्षेत्राच्या दक्षिणेकडील भागातून घुसले होते.
दुसरीकडे नैऋत्य दिशेला दोन शेनयांग J-16 लढाऊ विमाने, एक Shaanxi Y-8 अँटी-सबमरीन युद्ध विमान आणि BZK-007 ड्रोन घुसले होते. आग्नेय भागात हार्बिन Z-9 अँटी-सबमरीन हेलिकॉप्टर देखील दिसले. यामुळे सतर्क झालेल्या तैवानी हवाई दलाने विमाने, नौदल नौका आणि जमिनीवरून मारा करणारी मिसाईल डागली.
चीनने या महिन्यात आतापर्यंत 67 नौदल जहाजे आणि 266 लष्करी विमाने तैवानच्या समुद्री- हवाई हद्दीत पाठविली आहेत.