२६ लाखांची सायकल
By admin | Published: June 26, 2017 01:05 AM2017-06-26T01:05:07+5:302017-06-26T01:05:07+5:30
दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या किमती सायकलच्या किमतीहून कितीतरी अधिक आहेत. परंतु एक सायकल अशी आहे जिची किंमत ऐकल्यानंतर
दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या किमती सायकलच्या किमतीहून कितीतरी अधिक आहेत. परंतु एक सायकल अशी आहे जिची किंमत ऐकल्यानंतर तुम्हीही म्हणाल काय सांगता? या सायकलची किंमत चार-पाच लाख रुपये नाहीतर तब्बल २६ लाख रुपये आहे. फ्रान्सची सुपरकार निर्माती कंपनी बुगातीने ही अतिमहागडी सायकल तयार केली आहे. या सायकलचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा रंग बदलता येतो. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार तिचा रंग बदलू शकता. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कार्बन फायबरची असल्यामुळे ही सायकल वजनाने अत्यंत हलकी आहे. तिचे वजन केवळ ११ पौंड म्हणजे पाच किलो आहे. तिसरे वैशिष्ट्ये म्हणजे तिचा वेग प्रचंड आहे. गती अधिक असावी यासाठी तिच्यात एरोडायनॅमिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. तिचे डिझाइन सुपर कार डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आले असल्यामुळे स्पोर्टस्् रायडिंग श्रेणीतील ही सायकल खराब रस्त्यांवरही उत्तम धावते तसेच सायकलस्वाराला फारसे झटके बसत नाहीत. ही लिमिटेड एडिशन सायकल असल्यामुळे अशा केवळ ६६७ सायकली तयार करण्यात आल्या आहेत.