इस्नयली हल्ल्यात 26 पॅलेस्टिनी ठार
By admin | Published: July 20, 2014 02:01 AM2014-07-20T02:01:46+5:302014-07-20T02:01:46+5:30
इस्नयली लष्कराने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हल्ले तीव्र करीत एकाच कुटुंबातील आठ सदस्यांसह 26 पॅलेस्टिनींना ठार मारले.
Next
गाझा/जेरुसलेम : इस्नयली लष्कराने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हल्ले तीव्र करीत एकाच कुटुंबातील आठ सदस्यांसह 26 पॅलेस्टिनींना ठार मारले.
हमासच्या ताब्यातील गाझा पट्टीत रात्रभर झालेल्या या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यामुळे 12 दिवसांपासूनच्या या संघर्षातील बळींची संख्या वाढून 3क्क् झाली, तर हजारो पॅलेस्टिनीनागरिक विस्थापित झाले आहेत. उत्तर गाझात करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये तीन इस्नयली सैनिक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे, असे इस्नयली सुरक्षा दलाने आज सांगितले.
इस्नयली मोहिमेत 4क् हून अधिक दहशतवादी मारले गेले, तर 21 जणांना अटक करण्यात आली आहे. गाझा पट्टीत गेल्या पाच वर्षात प्रथमच होत असलेल्या सर्वात भीषण संघर्षात एक इस्नयली सैनिक ठार, तर इतर पाच जखमी झाले.
इस्नयली सुरक्षा दलाने शुक्रवारपासून जमिनीवरील, तसेच हवाई हल्ले तीव्र केले आहेत. हमासचे अधिकाधिक नुकसान करणो हा या हल्ल्यांचा उद्देश आहे.
इस्नयली हल्ल्यांत आतार्पयत मारल्या गेलेल्या 3क्क् जणांपैकी बहुतांश नागरिक असून 2 हजार 2क्क् जण जखमी झाले आहेत. इस्नयलची कारवाई सुरू झाल्यापासून गाझा पट्टीतून 4क् हजारांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत.(वृत्तसंस्था)