पाक न्यायालयाची २६/११ प्रकरणी नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2016 04:09 AM2016-05-31T04:09:15+5:302016-05-31T04:09:15+5:30

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली अल फौज या बोटीची तपासणी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्यात यावा, या अर्जाच्या संदर्भात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने

26/11 case of Pak court | पाक न्यायालयाची २६/११ प्रकरणी नोटीस

पाक न्यायालयाची २६/११ प्रकरणी नोटीस

Next

इस्लामाबाद : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली अल फौज या बोटीची तपासणी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्यात यावा, या अर्जाच्या संदर्भात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार झकी उर रेहमान लखवी याच्यासह सहा आरोपी आणि पाकिस्तान सरकारला नोटीस बजावली आहे.
मुंबईवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानच्या कराची बंदरातून याच अल फौज बोटीने १0 दहशतवादी २३ नोव्हेंबर २00८ रोजी भारतात यायला निघाले होते. या दहशतवाद्यांकडे एके४७ रायफली तसेच हॅण्डग्रेनेड होते. त्या बोटीची आयोगामार्फत तपासणी करण्यात यावी, अशी विनंती अर्जदारांतर्फे करण्यात आली असून, ती बोट सध्या कराची बंदरात पाकिस्तान सरकारच्या ताब्यात आहे. या बोटीसाठी अतिरेक्यांनी ज्या दुकानातून इंजीन विकत घेतले होते, त्या मालकाचीही ओळख पटली आहे. भारताच्या किनाऱ्यावर आल्यावर एका अन्य बोटीचा ताबा घेताना अतिरेक्यांनी त्यातील चार जणांना ठार केले होते.

Web Title: 26/11 case of Pak court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.