२६/११ दहशतवादी हल्ला : लख्वीसह ६ आरोपींवर चालणार खटला

By admin | Published: May 20, 2016 06:51 PM2016-05-20T18:51:09+5:302016-05-20T18:57:35+5:30

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वीलह ६ आरोपींवर पाकिस्तान कोर्टात खटला चालणार आहे.

26/11 terror attack: Six accused in Lakhvi case | २६/११ दहशतवादी हल्ला : लख्वीसह ६ आरोपींवर चालणार खटला

२६/११ दहशतवादी हल्ला : लख्वीसह ६ आरोपींवर चालणार खटला

Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २०  - मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वीलह ६ आरोपींवर पाकिस्तान कोर्टात  खटला टालणार आहे. याची मंजूरी पाकिस्तान कोर्टाने आज दिली आहे. १६६ सामान्य नागरिकांच्या हत्या करण्यास उसकावल्याचा आरोप त्याच्यावर आहे. २५ मे रोजी या खटल्याची पुढील सुनावणी होणार आहे. 
 यापुर्वी, १३ मार्च २०१५ रोजी लख्वी विरोधात ठोस पुरवे नसल्यामुळे लख्वीची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत इस्लामाबाद कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता व लख्वीची तत्काळ सुटका करण्याचे आदेश ही न्यायालयाने होते. लख्वी हा फेब्रुवारी २००९ पासून तुरूंगात होता.  
 
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जण मृत्युमखी पडले होते, तर शेकडो जण गंभीर जखमी झाले होते. 
 

Web Title: 26/11 terror attack: Six accused in Lakhvi case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.