औद्योगिक दुर्घटनांमुळे जगात दरवर्षी २७ लाख लोकांचा मृत्यू- संयुक्त राष्ट्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 03:57 AM2019-04-21T03:57:30+5:302019-04-21T03:57:41+5:30
भोपाळ दुर्घटना विसाव्या शतकातील मोठ्या दुर्घटनांपैकी एक
संयुक्त राष्ट्रे : हजारो लोकांना मृत्यूच्या खाईत ढकलणारी १९८४ ची भोपाळ गॅस दुर्घटना जगातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटनांपैकी एक आहे, असे मत संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, दरवर्षी औद्योगिक दुर्घटना आणि अशा कामांमुळे होणारे आजार यामुळे २७.८ लाख लोकांचा मृत्यू होतो.
संयुक्त राष्ट्रांची कामगार एजन्सी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून (आयएलओ) जारी अहवालात म्हटले आहे की, मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये युनियन कार्बाईडच्या प्रकल्पात मिथाईल आयसोसायनेट गॅस गळतीचा ६ लाखांहून अधिक मजूर आणि आजूबाजूचे लोक यांना फटका बसला.
सरकारी आकड्यांनुसार १५ हजार लोकांचा मृत्यू झाला. विषारी कण आजही आहेत. हजारो पीडित आणि त्यांची पुढील पिढी श्वसनसंबंधी आजारांशी संघर्ष करीत आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, १९१९ नंतर भोपाळ दुर्घटना ही जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक दुर्घटनांपैकी एक होती. १९१९ नंतरच्या अन्य मोठ्या औद्योगिक दुर्घटनात चेर्नोबिल आणि फुकुशिमा अणू प्रकल्प दुर्घटना यासह राणा प्लाजा इमारत कोसळल्याची घटना यांचा समावेश आहे. मात्र भोपाळमधील दुर्घटनेचे परिणाम आजही जाणवत आहेत. (वृत्तसंस्था)
मृत्यूचे कारण तणाव, कामाचे तास अधिक
दरवर्षी या औद्योगिक घटनांशी संबंधित मृत्यूंचे कारण तणाव, कामाचे अधिक तास आणि आजार हे आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मनाल अज्जी यांनी सांगितले की, या अहवालात म्हटले आहे की, ३६ टक्के कामगार खूप तास काम करतात. म्हणजेच, दर आठवड्याला ४८ तासांपेक्षा अधिक़