सामान्य ग्राहकांप्रमाणे २८ लोक एकाच हॉटेलमध्ये उतरले; अॅडल्ट फिल्म शूट केली, कर्मचारी हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 06:05 PM2023-01-23T18:05:19+5:302023-01-23T18:05:40+5:30
धक्कादायक म्हणजे या लोकांनी त्यापूर्वी हॉटेलपासून जवळच असलेले रिसॉर्ट बुक केले होते. परंतू त्यांचे वर्तन पाहून त्याच्या मालकाने त्यांना तेथून हाकलले होते.
ब्रिटनमध्ये हॉटेलच्या परवानगीविना एडल्ट फिल्म शूट केल्याप्रकरणात २८ लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. या लोकांनी हॉटेलच्या रुम एकत्रच बुक केल्या होत्या. यानंतर त्यांनी तिथे अनेक अश्लिल व्हिडीओ बनविले. जेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती झाली तोवर खूप उशिर झाला होता.
ब्रिटनच्या न्यूकास्टलमध्ये हा प्रकार घडला आहे. हॉटेलमालकानेही असा प्रकार घडला असल्याचे म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे या लोकांनी त्यापूर्वी हॉटेलपासून जवळच असलेले रिसॉर्ट बुक केले होते. परंतू त्यांचे वर्तन पाहून त्याच्या मालकाने त्यांना तेथून हाकलले होते. यानंतर या लोकांनी ऑनलाईनद्वारे वेगवेगळ्या बुकिंग आयडीद्वारे एक हॉटेल बुक केले होते.
रिसॉर्टवाल्याने हाकलल्यानंतर या लोकांनी आजुबाजुला एखादा असा स्पॉट मिळतो का ते पाहिले होते. परंतू, ते तीवॅ बर्फवृष्टी होत असल्याने अडकले होते. यामुळे या लोकांनी ट्रॅव्हल लॉजच्या माध्यमातून एका रात्रीसाठी हे हॉटेल बुक केले होते.
येथे पोहोचल्यावर य़ा अॅडल्ट मुव्हीजच्या लोकांनी अश्लिल फोटो शुट करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये एकाच बेडवर सात तरुणी पहुडलेल्या होत्या. या अश्लिल फिल्म प्रकाराची वाच्यता झाल्यावर या तरुणींमध्ये असलेली अक्ट्रेस लेसी एमॉरने आम्ही आमचे काम करत होतो, असे म्हटले आहे.
याप्रकरणी ट्रॅव्हललॉज या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे. आमच्या एका हॉटेलमध्ये विनापरवानगी व्हिडिओ शूट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. हे लोक अॅडल्ट इंडस्ट्रीशी संबंधित असल्याची माहितीही ग्रुपने दिली नव्हती. चौकशी केली जात आहे, हे लोक कधीही आमच्या हॉटेल चेनमध्ये बुकींग करू शकणार नाहीत, असे ट्रॅव्हललॉजने म्हटले आहे.