२८ हजार KM/PH स्पीड, १६०० डिग्री पारा...आगीच्या गोळ्यात बसून पृथ्वीवर कशी पोहचली सुनीता विलियम्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 18:06 IST2025-03-19T18:06:05+5:302025-03-19T18:06:57+5:30

Sunita Williams: ९ महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पृथ्वीवर परतण्याचा आनंद होण्यापूर्वी काही तास असेही होते जेव्हा सर्व अंतराळवीरांसह जगातील लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. 

28 thousand KM/PH speed, 1600 degrees Celsius Heat... How did Sunita Williams reach Earth sitting in a ball of fire? | २८ हजार KM/PH स्पीड, १६०० डिग्री पारा...आगीच्या गोळ्यात बसून पृथ्वीवर कशी पोहचली सुनीता विलियम्स?

२८ हजार KM/PH स्पीड, १६०० डिग्री पारा...आगीच्या गोळ्यात बसून पृथ्वीवर कशी पोहचली सुनीता विलियम्स?

नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरवरून तब्बल ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. नासाचे सर्व ४ अंतराळवीर स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्ट कॅप्सूलमध्ये बसून ISS पासून पृथ्वीवर आले. स्पेसएक्सच्या या कॅप्सूलने १७ तासांचा प्रवास करत भारतीय वेळेनुसार, बुधवारी सकाळी ३ वाजून २७ मिनिटांनी फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर स्प्लॅशडाउन केले. 

या प्रवासात सुनीता विलियम्स, बूच विल्मोर यांच्यासह नासाचे निक हेग, रशिया स्पेस एजेंसी रॉसकॉस्मोसचे अलेक्जेंडर गोरबुलनोव हेदेखील होते. स्पेसएक्स कॅप्सूलने पृथ्वीवर परतल्यानंतर स्पॅशडाऊनच्या एक तासांनी सुनीता विलियम्स हसत हसत कॅमेऱ्यासमोर हाताने अभिवादन करत बाहेर पडली. ९ महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पृथ्वीवर परतण्याचा आनंद होण्यापूर्वी काही तास असेही होते जेव्हा सर्व अंतराळवीरांसह जगातील लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. पृथ्वीवर परतण्याच्या प्रवासात स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्टने सर्वात कठीण टप्पा पृथ्वीच्या कक्षेत एन्ट्री करण्याचा होता. 

यावेळी स्पेसक्राफ्टचा वेग २८८०० किमी प्रति तासाहून जास्त होता. ज्यामुळे घर्षण होऊन स्पेसक्राफ्टच्या बाहेरील भागाचं तापमान जवळपास १६०० डिग्री सेल्सियस इतके झाले. अधिकच्या तापमानामुळे स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना एका आगीच्या गोळ्यासारखे उतरत होते. स्पेसक्राफ्टमध्ये अंतर्गत भागात लावलेल्या हिटशील्डमुळे त्यात बसलेले सर्व अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले. 

स्पेसक्राफ्ट आगीचा गोळा बनल्यानंतर अंतराळवीर कसे राहतात सुरक्षित?

स्पेसएक्सने ड्रॅगन कॅप्सूलला पृथ्वीच्या कक्षेतील तापमानापासून वाचण्यासाठी PICA चे फेनोलिक इम्प्रेगनेटेड कार्बन एब्लेटरचं हीट रेजिस्टेंट केसिंग कवच होते. या लाइट वेट मटेरियलचा वापर सर्वात आधी नासाने केला होता. त्यानंतर स्पेसएक्सने त्यांच्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनहून कार्गो आणि मानवी वाहतुकीसाठी PICA टाइल्सचा वापर करायला सुरुवात केली. 

NASA नं शेअर केला व्हिडिओ

नासाने चारही अंतराळवीरांचा पृथ्वीवर परतल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला. यात स्पेस स्टेशनवरून परतलेले अंतराळवीर अभिवादन  करताना दिसत आहेत. "पृथ्वीवर परतल्यानंतर Crew9 ची पहिली झलक आपल्याला बघायला मिळत आहे! आता रिकव्हरी पथके ड्रॅगनमधून बाहेर येण्यासाठी क्रूला मदत करतील, ही दीर्घकाळाच्या मोहिमेवरून परतल्यानंतर सर्व क्रू सदस्यांसाठी असलेली एक मानक प्रक्रिया आहे असं त्यांनी लिहिलं होते. 
 

Web Title: 28 thousand KM/PH speed, 1600 degrees Celsius Heat... How did Sunita Williams reach Earth sitting in a ball of fire?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.