सुदानमधील टँकर स्फोटात १८ भारतीय ठार, ३० जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 01:54 AM2019-12-05T01:54:30+5:302019-12-05T01:54:46+5:30

बेपत्ता भारतीयांपैकी काही जण मृतांच्या यादीत असू शकतील.

3 Indians killed, 5 injured in tanker explosion in Sudan | सुदानमधील टँकर स्फोटात १८ भारतीय ठार, ३० जण जखमी

सुदानमधील टँकर स्फोटात १८ भारतीय ठार, ३० जण जखमी

Next

खार्टूम (सुदान) : खार्टूममधील बाहरी भागातील सिरॅमिक कारखान्यात मंगळवारी एलपीजी टँकरचा स्फोट होऊन २३ जण ठार, तर १३० जण जखमी झाले. मृतांमध्ये किमान १८ भारतीय आहेत, असे भारतीय वकिलातीने बुधवारी सांगितले. स्फोटानंतर १६ भारतीय बेपत्ता होते. ताज्या वृत्तानुसार किमान १८ जण मरण पावले असले तरी या संख्येला दुजोरा मिळालेला नाही, असेही वकिलातीने म्हटले. गंभीर जखमी झालेल्या चार भारतीयांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बेपत्ता भारतीयांपैकी काही जण मृतांच्या यादीत असू शकतील. मृतदेह फारच जळालेले असल्यामुळे आम्ही अजूनही त्यांची ओळख पटवू शकलेलो नाही, असे त्यात म्हटले. नवी दिल्लीतील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारखान्यात ६८ भारतीय काम करीत होते.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, काही भारतीय कामगारांना जीव गमवावा लागला व काही गंभीर जखमी झाले हे फारच दु:खदायक झाले.
अपघात घडला त्या ठिकाणी दुतावासातून प्रतिनिधी दाखल झाला. २४ तास तातडीची सेवाही हॉटलाईनवर (२४९-९२१९१७४७१) उपलब्ध करण्यात आली
आहे.
दुतावासाकडून समाज माध्यमांवर ताज्या घडामोडी दिल्या जात आहेत. कामगारांच्या कुटुंबियांसाठी आम्ही प्रार्थना करतो, असेही जयशंकर यांनी टिष्ट्वटरवर म्हटले.
भारतीय दुतावासाने बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले, बेपत्ता किंवा या दुर्घटनेतून वाचलेल्या भारतीयांची यादी प्रसिद्ध केली. या यादीनुसार सात भारतीयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ३४ भारतीय यात बचावले असून त्यांना सलुमी सिरॅमिक्स फॅक्ट्रीच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

सुरक्षेबद्दल गांभीर्य नाही
सुदानच्या सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार गॅस टँकरमध्ये स्फोट झाला व त्याने औद्योगिक क्षेत्रात आग लागली.
प्राथमिक निरीक्षणानुसार कारखान्यात सुरक्षेची आवश्यक उपाययोजना व उपकरणांची उणीव दिसली. या शिवाय ज्वलनशील साहित्यही वाट्टेल तसे साठवून ठेवले गेले होते.

Web Title: 3 Indians killed, 5 injured in tanker explosion in Sudan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.