‘जिहाद’ विद्यापीठाला ३० कोटींची मदत!
By admin | Published: June 20, 2016 04:48 AM2016-06-20T04:48:00+5:302016-06-20T04:48:00+5:30
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वॉ प्रांताच्या सरकारने ‘जिहादचे विद्यापीठ’ अशी ओळख असलेल्या मदरशाला ३० कोटी रुपयांची मदत दिली आहे. या मदरशाशी अफगाण तालिबानचा माजी प्रमुख
पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वॉ प्रांताच्या सरकारने ‘जिहादचे विद्यापीठ’ अशी ओळख असलेल्या मदरशाला ३० कोटी रुपयांची मदत दिली आहे. या मदरशाशी अफगाण तालिबानचा माजी प्रमुख मुल्ला उमरसह अनेक वरिष्ठ तालिबानी नेते संबंधित होते व आहेत. दारूल उलुम हक्कानिया नौशेरा मदरशाला त्याच्या वार्षिक खर्चासाठी ३०० दशलक्ष रुपये देताना मला खूप अभिमान वाटत असल्याचे खैबर पख्तुनख्वॉचे मंत्री शाह फर्मान यांनी खैबर पख्तुनख्वॉ विधिमंडळात सांगितले.
इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील तहरिक ए इन्साफ (पीटीआय) सरकार खैबर पख्तुनख्वॉमधील धार्मिक संस्थांवर धाडी घालत नाही, की त्यांना लक्ष्य करीत नाही. उलट त्यांना सहकार्यच करीत आहे. त्यांना आर्थिक साह्यही देत आहे, असे फर्मान म्हणाले.
दारूल उल हक्कानिया ही पाकिस्तानात १९४७ मध्ये स्थापन झालेली शिक्षण संस्था असल्यामुळे तिला आर्थिक मदत मिळायलाच हवी, असे सांगण्यात आले. मौलाना सामी उल हक हे जमिअत उलेमा ए इस्लामचे नेते सध्या दारूल उल हक्कानियाचे प्रमुख आहेत. खैबर पख्तुनख्वॉमधील इतर धार्मिक संस्था आणि मशिदींनाही सरकार मदत देत असल्याचे फर्मान म्हणाले. (वृत्तसंस्था)