इंडोनेशियन नागरिकांना ३० दिवसांचा फ्री व्हिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 04:53 AM2018-05-31T04:53:58+5:302018-05-31T04:53:58+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इंडोनेशियाच्या नागरिकांना ३० दिवसांच्या फ्री व्हिसाची घोषणा केली.

30 days free visa for Indonesian citizens | इंडोनेशियन नागरिकांना ३० दिवसांचा फ्री व्हिसा

इंडोनेशियन नागरिकांना ३० दिवसांचा फ्री व्हिसा

Next

जाकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इंडोनेशियाच्या नागरिकांना ३० दिवसांच्या फ्री व्हिसाची घोषणा केली. इंडोनेशियाच्या नागरिकांनी त्यांचे मूळ असलेल्या देशाला भेट द्यावी व ‘नवा भारत’ अनुभवावा, असे निमंत्रणही त्यांनी दिले.
तत्पूर्वी, इंडोनेशियात तीन चर्चेसवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मोदी यांनी तीव्र निषेध केला व इंडोनेशियाने दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेल्या लढाईत भारत त्याच्यामागे ठामपणे राहील, अशी ग्वाही दिली.
इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या देशांच्या दौऱ्यावर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येथे आगमन झाले. येथील जाकार्ता कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बुधवारी भारतीय समुदायाशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, आमच्या देशांच्या नावांतच यमक आहे, असे नाही तर भारत आणि इंडोनेशियाच्या
मैत्रीत सुरुवातीपासून विलक्षण अशी लय आहे. भारतातर्फे आम्ही इंडोनेशियाती नागरिकांना
३० दिवसांच्या प्रवासासाठी विनामूल्य व्हिसा मंजूर करीत आहोत. तुमच्यापैकी अनेक जण
आजवर कधीही भारतात आलेले नसावेत. भारतात प्रयागमध्ये पुढील वर्षी होणार असलेल्या भव्य कुंभमेळ््याला जरूर या, असे मी तुम्हाला निमंत्रण देत आहे.

मशिदीला दिली भेट
इंडोनेशियात आग्नेय अशियातील सर्वात मोठ्या इस्तिकलाल मशिदीला मोदी यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत विडोडो होते. मशिदीला भेट देऊन आनंद झाल्याचे मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या देशांच्या दौºयावर मंगळवारी मोदी यांचे जाकार्तामध्ये आगमन झाले.

अर्जुन विजय रथ : जाकार्ता शहरातील अर्जुन विजय रथ पुतळ््याला मोदी यांनी जोको विडोडो यांच्यासह भेट दिली. आठ अश्व ओढत असलेल्या या रथाचे सारथ्य श्रीकृष्ण करीत असून रथामध्ये अर्जुन धनुष्य व बाण घेऊन उभा आहे.

स्मारकावर पुष्पचक्र
इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण गमावलेल्यांना मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. येथील कालिबाता नॅशनल हिरोज दफनभूमीत मोदी यांनी हुतात्म्यांसाठी पुष्पचक्र वाहिले. सैनिकी डावपेचांच्यादृष्टिने महत्वाच्या असलेली अंदमान आणि निकोबार बेटे आणि इंडोनेशियात व्यापार, पर्यटन व लोकांच्या एकमेकांशी थेट संपर्काला प्रोत्साहन देण्यासाठी उभय देशांनी विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन करण्याचे मान्य केले. नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्यात झालेल्या चर्चेनंतर प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

गेल्या अडीच वर्षांत भारतात नऊ हजारांपेक्षा जास्त स्टार्टअपस्ची नोंदणी झाली आहे. इंडोनेशियात राहणाºया माझ्या मित्रांनो हे भारतात घडत आहे. कायदे तेच आहेत, अधिकारीही तेच, कार्यालयेही तीच, टेबल्स आणि खुर्च्याही त्याच. बदलले आहे ते फक्त सरकार आणि देश बदलतो आहे. - मोदी

मृत्युमुळे दु:ख : जोको विडोडो यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दिलेल्या निवेदनात मोदी म्हणाले की, मित्रांनो, इंडोनेशियातील नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत निष्पाप नागरिकांच्या मृत्यूने मला दु:ख झाले आहे.

Web Title: 30 days free visa for Indonesian citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.