इटलीत हिमस्खलनाच्या तडाख्याने ३० लोक ठार
By admin | Published: January 20, 2017 06:09 AM2017-01-20T06:09:39+5:302017-01-20T06:09:39+5:30
भूकंपग्रस्त मध्य इटलीतील एक स्की रिसार्ट हॉटेल हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडून ३० लोक ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
Next
रोम : भूकंपग्रस्त मध्य इटलीतील एक स्की रिसार्ट हॉटेल हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडून ३० लोक ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
हॉटेल रेसोपियानो बर्फाच्या दोन मीटर उंच भिंतीखाली गाडले गेले असून, आपत्कालीन कर्मचारी तेथील बर्फ हटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रान सासो पर्वताच्या पूर्वेकडील उतारावर असलेल्या या हॉटेलमध्ये दुर्घटनेवेळी ३० पाहुणे आणि
कर्मचारी होते. बुधवारी याचवेळी या भागात शक्तिशाली भूकंप झाला होता.
पर्वतीय पोलीस स्की आणि हेलिकॉप्टरद्वारे घटनास्थळी पोहोचले असून, मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)