अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हल्ल्यात 30 सैनिकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 03:01 PM2018-06-20T15:01:08+5:302018-06-20T15:01:08+5:30
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी दोन ठिकाणी केलेल्या हल्ल्यांमध्ये 30 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
काबूल - अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी दोन ठिकाणी केलेल्या हल्ल्यांमध्ये 30 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमधील पश्चिम बादगीस प्रांतात तालिबानने हे हल्ले केले. तालिबानी हल्लेखोरांनी सुरुवातीला चेक पॉईंटवर हल्ला केला. त्यानंतर मुर्गाब जिल्ह्यात मदत कार्यासाठी येत असलेल्या लष्कराच्या जवानांना लक्ष्य केले, अशी माहिती बादतीसच्या प्रांतीय परिषदेचे प्रमुख अब्दुल अजीज बेग यांनी सांगितले.
मंगळवारी संध्याकाळी सुरू झालेले हे हिंसाचाराचे तांडव बुधवारी दुपारपर्यंत सुरू होते. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तरदाखल कारवाई केली. या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले. मात्र त्यांचा निश्चित आकडा देता येणार नाही. असे सुरक्षा दलांकडून सांगण्यात आले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप तरी कुठल्याही दहशतवादी संघटननेने स्वीकारलेली नाही. मात्र या भागात तालीबान सक्रीय आहे. त्यामुळे या हल्यात तालिबानचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Afghan official says at least 30 soldiers were killed when Taliban fighters targeted two checkpoints in western Badghis province in Afghanistan, reports The Associated Press.
— ANI (@ANI) June 20, 2018
ईदच्या पार्श्वभूमीवर तालिबानने सुक्षा दलांसोबत तीन दिवसांच्या शस्त्रसंधीची घोषणा केली होती. ईदचा सण आटोपल्यावर सरकारने या शस्त्रसंधीची मुदत वाढवण्याची मागणी केली होती. मात्र तालिबाबने ही मागणी फेटाळून लावली होती.