नशीबवान; 30 वर्षीय तरुण एका झटक्यात रतन टाटांपेक्षा चारपट श्रीमंत झाला; 200 कोटींचे घरही घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 13:32 IST2023-03-10T13:31:52+5:302023-03-10T13:32:13+5:30
जगातील अनेकांना नशीबाने खूप काही मिळालं आहे, हा तरुण त्यापैकीच एक आहे.

नशीबवान; 30 वर्षीय तरुण एका झटक्यात रतन टाटांपेक्षा चारपट श्रीमंत झाला; 200 कोटींचे घरही घेतले
Strange News : लोक म्हणतात की, नशीबावर विश्वास ठेवू नका, मेहनत करा. पण, जगातील अनेकांना मेहनतीपेक्षा नशीबानेच खूप काही मिळालं आहे. अशाच एका 30 वर्षीय नशीबवान तरुणाला नशीबाने एका झटक्यात श्रीमंत केलं. तो इतका श्रीमंत झाला की, त्याने भारतातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपती रतन टाटा यांनाही मागे टाकले.
ब्रिटिश न्यूजपेपर इंडिपेंडंटच्या रिपोर्टनुसार, हा तरुण रतन टाटा यांच्यापेक्षा चारपट श्रीमंत झाला. सध्या रतन टाटांची वैयक्तिक मालमत्ता सुमारे 4000 कोटी रुपयांची आहे. तर, हा तरुण एका झटक्यात 16 हजार कोटींहून अधिक संपत्तीचा मालक बनला. अब्जाधीश झाल्यानंतर त्याचे जगातील सर्वात महागड्या भागात, म्हणजेच कॅलिफोर्नियामध्ये सुमारे 25 मिलियन डॉलर्समध्ये एक हवेली विकत घेतला आहे. या हवेलीची किंमत 200 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात एडविन कॅस्ट्रो या अमेरिकन तरुणाने दोन अब्ज डॉलर्सची लॉटरी जिंकली. ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये 16,407 कोटी रुपये आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा लॉटरी विजय होता. जगभरातील माध्यमांमध्ये त्याची चर्चा झाली. पण, एवढी मोठी रक्कम जिंकूनही हा तरुण जगासमोर आला नाही. पण, त्याचे नाव आणि वय उघड झाले. कॅस्ट्रोने लॉटरीचे पैसे एकरकमी घेण्याचा निर्णय घेतला. कर आणि इतर कपातीनंतर त्यांला एकूण $997 दशलक्ष म्हणजे 8,180 कोटी रुपये मिळाले.