एकाचवेळी तीन हजार पेजरस्फाेट, इस्रायलचा हिजबुल्लाह संघटनेवर टेक्नोसॅव्ही हल्ला;मोसाद गुप्तचर यंत्रणेने दाखविला हिसका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:31 AM2024-09-19T11:31:19+5:302024-09-19T11:31:39+5:30

पेजरच्या या वापरामुळे लेबनॉन व इस्रायलमधील संघर्षात आणखी वाढ झाली आहे. याचदरम्यान अनेक भागात घरातील सौरऊर्जा प्रणालीत स्फोट घडविण्यात आले आहेत.

3,000 simultaneous pagers, Israel's techno-savvy attack on the Hezbollah organization | एकाचवेळी तीन हजार पेजरस्फाेट, इस्रायलचा हिजबुल्लाह संघटनेवर टेक्नोसॅव्ही हल्ला;मोसाद गुप्तचर यंत्रणेने दाखविला हिसका

एकाचवेळी तीन हजार पेजरस्फाेट, इस्रायलचा हिजबुल्लाह संघटनेवर टेक्नोसॅव्ही हल्ला;मोसाद गुप्तचर यंत्रणेने दाखविला हिसका

तैपेई :इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहला मोठा धक्का देणारे ‘पेजर’ हंगेरीतील एका कंपनीने बनवले, असा खळबळजनक दावा तैवानमधील दुसऱ्या एका कंपनीने बुधवारी केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. पेजरच्या या वापरामुळे लेबनॉन व इस्रायलमधील संघर्षात आणखी वाढ झाली आहे. याचदरम्यान अनेक भागात घरातील सौरऊर्जा प्रणालीत स्फोट घडविण्यात आले आहेत.

लेबनॉन आणि सीरिया येथे एकाच वेळी स्फोट झालेल्या पेजरमुळे सुमारे १९ जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे २८०० जण जखमी झाले. या हल्ल्याबद्दल हिजबुल्लाह आणि लेबनॉनच्या सरकारने इस्रायलला जबाबदार धरले आहे.

‘महाविकास’च्या जागावाटप चर्चेला सुरुवात; चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार

इस्रायलने पेजर हल्ल्यानंतर अमेरिकेला मंगळवारी त्याबाबत कल्पना दिली. त्यानुसार या हल्ल्यात अत्यंत कमी प्रमाणात स्फोटके वापरली, असा दावा इस्रायलने केला आहे. अत्यंत आधुनिक पद्धतीने इस्रायलने केलेल्या या हल्ल्यामुळे जगाला एका नव्या युद्धतंत्राची ओळख झाली तर गाझापट्टीत सुरू असलेले युद्ध आता मोठ्या भागात पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

हिजबुल्लाहकडून पेजरचा वापर का?

पेजरचे तंत्रज्ञान मोबाइल येण्यापूर्वीचे आहे. परंतु, मोबाइल हॅक होण्याची शक्यता लक्षात घेऊन हिजबुल्लाहचे दहशतवादी अजूनही पेजरच वापरतात. परंतु, यावेळी इस्रायलने पेजरच हॅक केले.

तीनप्रकारे होऊ शकतो स्फोट....

सायबर नेटवर्कचा वापर करून.

पेजरच्या पुरवठा यंत्रणेत घुसखोरी करून त्यात स्फोटके बसवून.

स्वयंचलित यंत्रणांचा वापर करून.

हातात, खिशात ठेवलेल्या पेजरचा झाला स्फोट

लेबनॉनच्या अनेक शहरांत १८ सप्टेंबर रोजी लोकांच्या हातातील आणि खिशात ठेवलेल्या पेजरचे स्फोट झाले. हे स्फोट लेबनॉनपासून सीरियापर्यंत तब्बल १ तास सुरू होते.

बीएसी ही तैवानच्या कंपनीचीच फेक कंपनी

मंगळवारी इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेवर एआर-९२४ पेजरचा वापर केला.

हे पेजर हंगेरीतील बुडापेस्ट येथील बीएसी कन्सल्टिंग केएफटी या कंपनीने बनविल्याचा दावा तैवानची कंपनी गोल्ड अपोलोने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात करण्यात आला आहे.

तैवानची हीच कंपनी पेजरच्या या ब्रँडच्या वापराला मंजुरी देते. बीएसी ही या तैवानच्या कंपनीचीच बनावट कंपनी आहे, असे दिसते.

तीन वर्षांच्या करारानुसार आम्ही बीएसीला आमचा ब्रँड आणि ट्रेडमार्क विशिष्ट भागात वापरण्याची परवानगी दिली आहे; परंतु, पेजरची संरचना आणि निर्मितीची जबाबदारी बीएसीची आहे, असे गोल्ड अपोलोने म्हटले आहे.

आधी आला बीप.. बीप..चा आवाज

इस्रायलने केलेल्या पेजर हल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे आधी त्यातून कित्येक सेकंद ‘बीप.. बीप..’ असा आवाज आला आणि मग स्फोट झाले.

सोशल मीडियावर आलेले व्हिडीओ आणि छायाचित्रे यावरून शेकडो लोक रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत दिसतात.

जगातील पहिलाच पेजर हल्ला

दहशतवादी हल्ल्यांत आयईडी किंवा मोबाइल स्फोट जगाने पाहिले आहेत; परंतु, इस्रायलने जगात प्रथमच पेजर हल्ला केला.

त्यासाठी पेजरचे जाळेच हॅक करण्यात आले. इस्रायलनेच १९९६ मध्ये ‘बूबी ट्रॅप्ड मोबाइल’ बाॅम्बचा वापर करून हमासला नाकीनऊ आणले होते.

Web Title: 3,000 simultaneous pagers, Israel's techno-savvy attack on the Hezbollah organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.