नायजेरियातील स्फोटात ३२ ठार

By admin | Published: November 19, 2015 03:28 AM2015-11-19T03:28:24+5:302015-11-19T03:28:24+5:30

नायजेरियातील योला येथील गर्दी असलेल्या बाजारात शक्तिशाली बॉम्बस्फोट होऊन किमान ३२ जण ठार आणि अन्य ८० जण जखमी झाले. स्थानिक वेळेनुसार रात्री ८.२० वाजता ही घटना

32 people killed in Nigeria blast | नायजेरियातील स्फोटात ३२ ठार

नायजेरियातील स्फोटात ३२ ठार

Next

अबुजा : नायजेरियातील योला येथील गर्दी असलेल्या बाजारात शक्तिशाली बॉम्बस्फोट होऊन किमान ३२ जण ठार आणि अन्य ८० जण जखमी झाले. स्थानिक वेळेनुसार रात्री ८.२० वाजता ही घटना घडली. काही दिवसांपूर्वीच अध्यक्ष मुहम्मदू बुहारी यांनी या भागाला भेट देऊन बोको हराम ही अतिरेकी संघटना पराभवाच्या जवळ असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर लगेचच हा स्फोट झाला. या स्फोटाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही; तथापि त्यामागे बोको हराम ही संघटनाच असल्याचा संशय आहे. या देशात गेल्या सहा वर्षांत बोको हरामने केलेल्या हिंसाचारात १७ हजारांपेक्षा अधिक लोक ठार झाले.

Web Title: 32 people killed in Nigeria blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.