जमिनीखाली सापडली 3300 वर्ष जुनी 'गुलाबी कबर', समोर येणार राजांचे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 04:11 PM2022-10-04T16:11:05+5:302022-10-04T16:11:35+5:30
हा इजिप्तचा महान राजा रामसेसे द ग्रेटचा कोषाध्यक्ष होता. पुरातत्ववाद्यांनी य़ा शोधाला स्वप्नातील शोध म्हटलं आहे.
इजिप्तची राजधानी काहिरामध्ये हजारो वर्ष जुनी एक कबर सापडली आहे. असं सांगितलं जात आहे की, ही कबर एका महान इजिप्तच्या अधिकाऱ्याची आहे. ही कबर गुलाबी ग्रेनाइट दगडापासून तयार केलेली आहे. ही कबर काहिरामध्ये मृतदेह दफन केलेल्या एका प्राचीन चेंबरमध्ये सापडली आहे.
ही कबर पटाह-एम-विया ची असल्याचं सांगितलं जात आहे. हा इजिप्तचा महान राजा रामसेसे द ग्रेटचा कोषाध्यक्ष होता. पुरातत्ववाद्यांनी य़ा शोधाला स्वप्नातील शोध म्हटलं आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, या दगडाच्या कबरेच्या चारही बाजूने प्रतिके, चित्रलिपी आणि काही शब्द कोरलेले आहेत. हे 3,300 वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. ही कबर जमिनीच्या 23 फूट खालून वर काढण्यात आली.
Pink granite sarcophagus unearthed near Cairo hailed as 'dream discovery' https://t.co/lrfyH9oRyK
— Daily Mail Online (@MailOnline) October 3, 2022
दगडपासून तयार या कबरेचा शोध लावणाऱ्या ओला एल अगुइजिन यांना आशा आहे की, या शोधाच्या माध्यमातून तुतनखामुननंतर इजिप्तवर राज्य करणाऱ्या राजांबाबत बरीच माहिती मिळवली जाऊ शकते.
अगुइजिन म्हणाल्या की, कबरेवर दिसलेली चित्रलिपी याचा पुरावा आहे की, कबर पटाह-एम-विया याचीच आहे. कबरेवर लिहिलेले टायटल्स हे दर्शवतात की, तो एक महान व्यक्ती होता आणि राजाच्या फार जवळचा होता. तेव्हाच्या शासन व्यवस्थेत त्याची महत्वाची भूमिका राहिली असेल. ते तेव्हाच्या शासन व्यवस्थेत अर्थमंत्री होते.
पटाह-एम-वियाच्या या कबरेबाबत नॅशनल जिओग्राफीचा शो Lost Treasure Of Egypt च्या चौथ्या सीरीज दरम्यान माहिती दिली होती. इजिप्तच्या पर्यटन मंत्रालयाने सांगितलं की, दगडापासून तयार ही कबर चांगल्या स्थितीत आहे. फक्त कबरेच्या झाकणाचा एक भाग तुटला आहे.
प्रोफेसर ओला एल अगुइजिन यांची टीम आता या दगडाच्या कबरेचा अभ्यास करतील. पटाह-एम-विया च्या आयुष्याबाबत अनेक गोष्टींची माहिती मिळवली जाईल.